श्री ढोकेश्वर महाविद्यालय येथे माजी विद्यार्थी व पालक मेळावा संपन्न. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 9, 2023

श्री ढोकेश्वर महाविद्यालय येथे माजी विद्यार्थी व पालक मेळावा संपन्न.

 श्री ढोकेश्वर महाविद्यालय येथे माजी विद्यार्थी व पालक मेळावा संपन्न.


टाकळी ढोकेश्वर -
तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे श्री ढोकेश्वर महाविद्यालयात आज तिसऱ्या नॅकच्या पूर्वतयारीसाठी  माजी विद्यार्थी मेळावा व पालक मेळावा आयोजित केला होता. या प्रसंगी प्राचार्य मतकर सर म्हणाले माजी विद्यार्थी हे महाविद्यालयाचा आरसा आहे त्यावेळी ते बोलत होते. आजी-माजी विद्यार्थी व पालक हे महाविद्यालयाचे महत्त्वाचे घटक आहेत.  नॅकच्या पाहणी समिती समोर माजी विद्यार्थी व पालकांनी चांगल्या सूचना मांडाव्यात. या सूचना नवीन शैक्षणिक धोरणासाठी मार्गदर्शक ठरल्या तर  ग्रामीण उच्च  शिक्षणासाठी अधिक फायद्याचे होईल. असे मत व्यक्त केले. महाविद्यालय विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. किशोर कांबळे यांनी केले तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रा. विरेंद्र धनशेट्टी यांनी तर पालकाचे उदबोधन प्रा. शांता गडगे यांनी केले या वेळी श्रावण गायकवाड, विलास लोंढे महाराज, प्रोफेसर हरीश शेळके , सरपंच अभिजीत झावरे ,विठू महाराज शिंदे, पत्रकार संतोष कोरडे , गायकवाड सर, कोठावळे सर, मयुरी वाळुंज गोरडे , शांता गाडगे ,तांबे स्नेहल ,पालवे पूजा, साबळे प्रियांका ,धुमाळ भारती ,लोंढे सुवर्णा, सीमा रोहकले , अर्जू शेख, गंगोत्री वैशाली, दळवी रूपाली,पिंगट सविता ,वाघुंडे मॅडम आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here