साईबाबांची बदनामी करणार्‍या 2 जणांवर गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 2, 2023

साईबाबांची बदनामी करणार्‍या 2 जणांवर गुन्हा दाखल.

 साईबाबांची बदनामी करणार्‍या 2 जणांवर गुन्हा दाखल.

धार्मिक भावना दुखावल्याची तसेच दोन धर्मात तेढ निर्माण केल्याची तक्रार.


शिर्डी -
शिर्डी विकृतपणे साईबाबांची बदनामी करणार्‍या व्यक्तीच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी व दोन धर्मामध्ये तेढ निर्माण केल्या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष तथा साईबाबांच्या समकालीन भक्तांचे वंशंज शिवाजी गोंदकर यांनी या प्रकरणी गिरधर स्वामी, (पत्ता माहिती नाही)व हिरालाल श्रीनिवास काबरा, हैद्राबाद यांच्या विरोधात शिर्डी पोलीसांत तक्रार दाखल केली आहे.
दि.31 जानेवारी रोजी दुपारी शिवाजी गोंदकर यांनी यु ट्युबवर गिरधर स्वामी याने प्रसारीत केलेला एक व्हिडीओ बघितला, यामध्ये त्या व्यक्तीने साईबाबांच्या विषयी अत्यंत चुकीची माहिती कथन करुन धार्मिक भावना दुखावणाचा व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या संतापजनक प्रकारानंतर गोंदकरयांनी ही बाब तातडीने राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणुन दिली. यानंतर मंत्री विखे यांच्या सूचनेनुसार गोंदकर यांनी तातडीने संबधित व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी उशीरा शिर्डी पोलीस ठाण्यात आरोपी गिरीधर स्वामी व हिरालाल श्रीनिवास काबरा, हैद्राबाद यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावणे व धर्मा-धर्मात तेढ निर्माण करण्याप्रकरणीगुन्हा रजि नंबर 78/ 2023 भा.द.वी. कलम 153 (अ), 295 (अ) व 298, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस उपअधिक्षक संजय सातव व पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकाटे पुढील तपास करत आहेत. शिर्डीतील विविध सामाजिक व राजकीय संघटनांकडून या प्रकरणाचा तीव्र संताप व्यक्त केला आहे.


No comments:

Post a Comment