या पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक ’लाचलुचपत’ च्या ताब्यात. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 1, 2023

या पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक ’लाचलुचपत’ च्या ताब्यात.

या पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक ’लाचलुचपत’ च्या ताब्यात.


शेवगाव :
शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संतोष चंद्रकांत काकडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेवगाव पोलीस ठाण्यात मंगळवार, दि.31 रोजी लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदाराच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वी मोटार वाहन अपघातात मृत्यू झाला होता. सदर वाहन चालकावर गुन्हा दाखल करावा, यासाठी आरोपीने फिर्यादीकडे 20 हजार रुपयांची मागणी केली. या कारणास्तव तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या साधना इंगळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच्या पोलिस अधीक्षक सौ. शर्मिष्ठा घार्गे, वालावलकर, नारायण न्याहळदे, अपर पोलिस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक झोन, नरेंद्र पवार, वाचक, उपाधीक्षक कार्यालय, पोलिस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथील पोलीस अधिकारी पोह सचिन गोसावी, पोहवा प्रफुल्ल माळी, पोहवा चंद्रशेखर मोरे, पोहवा मनोज पाटील, पोहवा विनोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून आरोपीला पकडले. याप्रकरणी आज सायंकाळी साडेसहा वाजता तक्रार दाखल करण्यात आली.


No comments:

Post a Comment