बाळंतपणासाठी आलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने “मुन्नाभाई” चे पितळ उघड पडले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 2, 2023

बाळंतपणासाठी आलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने “मुन्नाभाई” चे पितळ उघड पडले.

 बाळंतपणासाठी आलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने “मुन्नाभाई” चे पितळ उघड पडले.

कोणतीही पदवी नसताना रुग्णांवर 20 वर्षे उपचार बोगस डॉक्टरला 4 फेब्रु. पर्यंत पोलीस कोठडी.


अहमदनगर -
नगर तालुक्यात वैद्यकीय सेवा देण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना स्वतःच्या वैद्यकीय पदवीच्या आधारावर ज्ञानदेव पवार याला दवाखाना चालविण्यास प्रोत्साहन दिले म्हणून डॉ. दिलीप बाबासाहेब भोस (रा. घो- गरगाव, ता.श्रीगोंदा) व ज्ञानेश्वर निवृत्ती पवार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक केलेल्या बोगस डॉक्टर ज्ञानदेव निवृत्ती पवारला न्यायालयात हजर केले असता शनिवार (दि.4) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचेआदेश न्यायालयाने दिले.
राज्यात मान्यता असलेली कोणतीही वैद्यकीय शिक्षणाची पदवी नसताना हा डॉक्टर ग्रामीण भागातीलरुग्णांवर उपचार करीत होता. पवार विरोधात अनेकदा तक्रारी होवूनही, आरोग्य विभागाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. रुईछत्तीसी येथील एका महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. प्रसुतीदरम्यान मृत महिलेच्या नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर वाढीव कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक वा. ए. चव्हाण करीत आहेत.
ज्ञानेश्वर निवृत्ती पवार हा बोगसडॉक्टर गेल्या 20 वर्षांपासून रुईछत्तीशी गावात एका पत्र्याच्या शेडमध्ये दवाखाना चालवत होता. कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना तो रुग्णांवर उपचार करत होता. आरोग्य विभागाने त्याला यापूर्वीही नोटिसा बजावलेल्या होत्या. परंतु त्याचा दवाखाना सुरूच होता. गावातील एका महिलेला बाळंतपणासाठी दवाखान्यात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मंगळवारी (दि. 31) मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूची बातमीमिळाल्यानंतर आरोग्य विभागाला खडबडून जाग आली. या विभागाच्या अधिकार्‍यांनी पोलिसांसह गावात जावून दवाखान्यावर छापा टाकला. त्यावेळी तिथे चार खाटांवर चार रुग्ण उपचार घेत असल्याचे निदर्शनास  आले. त्यातील एकाला एक इसम सलाईन लावत होता. त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव ज्ञानेश्वर निवृत्ती पवार, असे सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे यांनी पवार याच्याकडे वैद्यकीय पदवीच्या प्रमाणपत्राची मागणी केली. त्यावर हा दवाखाना डॉ. दिलीप बाबासाहेब भोस यांचा असून, सध्या मी सांभाळतो आहे. आपल्याकडे कुठलीही पदवी नाही, असे पवार म्हणाला. यावरून पवार हा बोगस डॉक्टर असल्याची पथकाची खात्री झाली. आरोग्य पथकाने दवाखान्याची झडती घेतली.
एका खोक्यात औषधे, गोळ्या, इंजेक्शन, स्टेरॉईड, सीरीप क्रिम, यासह अन्य औषधे मिळाली. त्यामुळे पवार याच्यासह डॉ. दिलीप बाबासाहेब भोस (रा. घोगरगाव, ता. श्रीगोंदा) यांच्या विरोधात भादवी कलम 419, 420, मेडिकल कौन्सिल अ‍ॅक्ट 1956 चे कलम 15(2) तसेच महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर अ‍ॅक्ट 1961 चे कलम 33 ( 2) 33 (ब), 36, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment