या ठिकाणी शेतात गेलेल्या महिलेची निर्घृण हत्या.. शरीराचे तुकडे करून फेकले जंगलात. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, January 31, 2023

या ठिकाणी शेतात गेलेल्या महिलेची निर्घृण हत्या.. शरीराचे तुकडे करून फेकले जंगलात.

या ठिकाणी शेतात गेलेल्या महिलेची निर्घृण हत्या.. शरीराचे तुकडे करून फेकले जंगलात.


मालेगाव : 
तालुक्यातील दहीदी येथील शेतकरी महिलेचा अतिशय क्रूरपणे खून केल्याची घटना समोर आली. सुमनबाई भास्कर बिचकुले (वय ३५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. शेताजवळील जंगलात त्यांच्या शरीराचे तुकडे करून फेकून देण्यात आले होते. तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहीदी गावाजवळ बिचकुले यांची शेती आहे. शेतात त्यांचे राहते घर असून, सोमवारी (दि.३०) सकाळी सूमनबाई मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. तर त्यांचे पती भास्कर हे शेतमाल विक्रीसाठी बाहेरगावी गेले होते. सायंकाळी भास्कर घरी आल्यावर पत्नी घरी नसल्याने ते शेतात पाहण्यासाठी गेले. तेथे त्या नसल्याने त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना बोलावून शोध सुरू केला. शेतात रक्ताने माखलेले फावडे आढळले आणि शेतापासून एक किमी अंतरावरील जंगलात सुमनबाई यांचे शीर, धड, पाय वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. अतिशय क्रूरपणे त्यांच्या खून करण्यात आल्याने परिसरातील नागरिक हादरले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस श्वानपथकासह दाखल झाले होते. रात्री उशिरा मृतदेह मालेगावी आणण्यात आला. मंगळवारी शोकाकुल वातावरणात त्यांचा अंत्यविधी पार पडला. सुमनबाई यांच्या पश्चात पती, सासू, सासरे, तीन मुली, दोन मुलगे असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here