वाढदिवस प्रसंगी जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 3, 2023

वाढदिवस प्रसंगी जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप....

 वाढदिवस प्रसंगी जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप....

अ‍ॅड.सुरेश सुंबे यांचा सामाजिक उपक्रम..


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यातील पाडळी तर्फे कान्हूर येथील ड. सुरेश अंजाबापु सुंबे यांनी वाढदिवस प्रसंगी आपले वडील कै. अंजाबापू गंगाराम सुंबे(मेजर) यांच्या स्मरणार्थ जि.प.प्रा.शाळा ठाकरवाडी (आळे)पो. जांभळी,ता.राहुरी, जि. अ.नगर या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.
वाढदिवस प्रसंगी अनाठाई, अनावश्यक खर्चाला टाळत आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना वही, पेन,दप्तर व इतर शाळा उपयोगी वस्तू वाटप करण्यात आले.
 ड.सुंबे हे नेहमीच समाज उपयोगी काम करत असतात त्यांच्या वकिली पेशामध्ये देखील त्यांनी  अनेक गरीब गरजू घटकांना आपल्या वकिलीच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करत समाजाप्रती एक आदर्श उभा केला आहे. यावेळी मुख्याध्यापक विकास दावभट, शिक्षक रामचंद्र खाडे,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष तुकाराम मधे,युवा उद्योजक संदीप थोरात,नवनाथ गाडगे,राजेंद्र सुंबे सर,ड.प्रसाद शेळके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment