बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमधील चूकीच्या प्रश्नांचे सहा गुण द्यावे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 22, 2023

बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमधील चूकीच्या प्रश्नांचे सहा गुण द्यावे.

 बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमधील चूकीच्या प्रश्नांचे सहा गुण द्यावे.

पारनेर - बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरमध्ये आज घोळ झाल्याचे समोर आले. इंग्रजी विषयाच्या पेपरच्या पान क्रमांक 10 वर प्रश्न क्रमांक ३ वरील उपप्रश्न  A3 , A4 आणि A5 मध्ये प्रश्नच दिलेला नाही. तर A4 मध्ये थेट प्रश्न ऐवजी उत्तरच दिलेले आहे. याबाबत परीक्षा मंडळांनी लवकरच योग्य तो निर्णय घेऊ असे प्रकटनाद्वारे सांगितले आहे. विद्यार्थ्यांचे गुणात्मक हित लक्षात घेता याबाबत राज्य परीक्षा मंडळांने विद्यार्थ्यांना 6 गुण द्यावेत असे मत महाराष्ट्र राज्य खाजी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांनी व्यक्त केले. 
प्रश्नपत्रिका मधील प्रश्न क्रमांक 3 हा कवितेवर आधारित प्रश्न होता. त्यातील प्रश्न क्र. QA3 , QA4 आणि QA5 हे तीन प्रश्न प्रत्येकी 2-2 गुणांचे होते. परंतु प्रश्नपत्रिका प्रश्न ऐवजी उत्तर व इतर सूचना छापल्यामुळे परीक्षार्थी परीक्षेदरम्यान गोंधळून गेल्याचे खाजगी शिक्षक संघटनेचे ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष प्राध्यापक वसंत भागवत यांनी सांगितले. 
बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपर मध्ये झालेल्या चुकीबाबत बोर्डाने लवकरात लवकर बैठक घेऊन विद्यार्थ्यांचे कोणतेही गुणात्मक नुकसान होणार नाही याबाबत खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य सचिव भानुदास शिंदे यांनी आग्रही भूमिका मांडत मत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment