वस्तुस्थिती कडे लक्ष द्या, खोटी बातमी असेल तर नोटीस काढा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 2, 2023

वस्तुस्थिती कडे लक्ष द्या, खोटी बातमी असेल तर नोटीस काढा

वस्तुस्थिती कडे लक्ष द्या, खोटी बातमी असेल तर नोटीस काढा.


कर्जत (आशिष बोरा):-
कर्जत शहरात सर्व सामाजिक संघटनेने गोळा केलेला कचरा पाच दिवसापासून जागेवरच या दै.  नगरीदवंडीने छापलेल्या बातमीवर नगर पंचायतच्या नगरसेवकांनी वास्तव स्वीकारून कचरा उचलणार्‍या व्हिडीके कंपनीला जाब विचारण्या ऐवजी बातमी प्रकाशित करणार्‍या पत्रकारासच तुम्ही खोटी बातमी का छापली असा जाब सोशल मीडियातून विचारला जात असून वस्तुस्थितीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.  
कर्जत नगर पंचायतने स्वछतेचा ठेका व्हिडीके या कंपनीला दिलेला आहे या कंपनीने कर्जत शहरातील कचरा उचलून त्यावर प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. शहरातील सर्व कचरा दररोज उचलण्या बरोबरच दररोज दोन वेळेस शहरात झाडलोट ही केली जात होती. गेली अडीच वर्षाच्या काळात शहरातील नागरिकांनी ऐकत्र येत दररोज श्रमदान करून कर्जत शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याचा प्रयत्न केला असून सर्व सामाजिक संघटनेच्या नावाने आजही 854 व्या दिवशी शहराला हरित करण्याचे ही काम अविरत पणे सुरू आहे. या अनुषंगाने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदान करून गोळा केलेला व गोणीत भरून ठेवलेला कचरा नगर पंचायतने त्याच दिवशी जास्तीत जास्त दुसरे दिवशी भरून नेणे अपेक्षित असताना पाच दिवस होऊन ही हा कचरा जागेवरच होता व हीच बाब बातमीच्या माध्यमातून दाखवून देण्यात आली असता याची वस्तुस्थिती तपासून संबंधित ठेकेदाराला जाब विचारण्याऐवजी कर्जत नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक नामदेव राऊत व अक्षय राऊत यांनी सोशल मीडियावर दि 27 जाने रोजी कचरा उचलण्यात आला होता, याचे फोटो प्रसारित करून आशिषजी यांनी खोटी बातमी छापली आहे, असे प्रसारित केले.  
प्रत्यक्षात सर्व सामाजिक संघटनानी 26 जाने रोजी केलेल्या श्रमदानातून गोळा केलेला कचरा 27 जाने रोजी उचलला गेला आहे हे दाखवून बातमीला खोटे ठरवत असताना सदर बातमीत 28 जाने या तारखेला झालेल्या श्रमदानाचा उल्लेख आहे या वस्तुस्थितीला मान्य करायला तयार नाहीत. व सोशल मीडियावर
कर्जत नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक नामदेव राऊत हे आशिष बोरा यांनाच आपण खोटी बातमी का छापली असा जाब विचारत आहेत.
बातमीच्या माध्यमातून लोकांमध्ये असलेली चर्चा, दिसत असलेली वस्तूस्थिती, हातात असलेले पुरावे, या घटनेबाबतचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असताना व या आधारे बातमी छापलेली असताना तिला खोटी ठरवत संबंधित कचरा बाहेरच्या व्यवसाईकानी कचराकुंडी जवळ आणू ठेवला असेल असे म्हणणे कितपत योग्य आहे हा प्रश्न असून राऊत यांनी  चर्चा करत लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा नगर पंचायत मार्फत खोटी बातमी छापली म्हणून  कायदेशीर नोटीस काढावी म्हणजे या विषयातील खरे खोटे सर्वसमोर येईल असे आवाहन पत्रकार आशिष बोरा यांनी केले आहे.
सोशल मीडियावर स्वच्छ कर्जतमध्ये नगर पंचायतचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष या बातमीच्या सत्य असत्यतेबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कर्जत नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सौ उषा राउत यांना याबाबत विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता आपल्याला कळवते असे म्हटले.
सदरची बातमी आल्यानंतर सचिन घुले यांनी व्हिडीकेचे भुजबळ यांना लाईन वर घेऊन बोरा यांचे बरोबर फोनवर चर्चा केली होती यावेळी यापुढे असे होणार नाही असे भुजबळ यांनी मान्य केले होते.
कर्जत शहरात श्रमदान करणार्‍या अनेकांनी बोरा यांना सत्य बातमी छापल्याचे फोन करून अथवा प्रत्यक्ष भेटून म्हटले असून अनेक जण सोशल मीडियावर प्रतिक्रिया द्यायला मात्र दबकत आहेत.

No comments:

Post a Comment