महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाबाबत कॅप्टन अमरिंदर यांनी सोडले मौन म्हणाले.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 3, 2023

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाबाबत कॅप्टन अमरिंदर यांनी सोडले मौन म्हणाले..

 महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाबाबत कॅप्टन अमरिंदर यांनी सोडले मौन म्हणाले..


पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी महाराष्ट्राचे पुढील राज्यपाल होण्याच्या सुरु असलेल्या अफवांवर आता मौन सोडले आहे. कॅप्टन यांनी याबद्दल आपल्याला कुठलीही कल्पना नसल्याचे सांगितले आहे. परंतु त्यांनी हे नाकारलेही नाही. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी जो काही निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल, असे कॅप्टन म्हणाले. पीएम सांगतील त्याठिकाणी मी जाईल. असेही ते म्हणाले.

अमरिंदर म्हणाले, माझ्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही. मला याबाबत काहीच माहिती नाही. मी आधीच पंतप्रधानांना सांगितले आहे की, त्यांना जिथे हवे असेल त्याठिकाणी नियुक्तीसाठी मी तयार आहे.

No comments:

Post a Comment