अंकिता मंडले सी ए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल कोठारी प्रतिष्ठान तर्फे सत्कार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 20, 2023

अंकिता मंडले सी ए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल कोठारी प्रतिष्ठान तर्फे सत्कार.

अंकिता मंडले सी ए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल कोठारी प्रतिष्ठान तर्फे सत्कार.
जामखेड - अंकिता प्रदीप मंडलेचा ( जैन ) सी ए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल कोठारी प्रतिष्ठान मार्फत भव्य सत्कार करण्यात आला.
या सत्कार समयी जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यवान डोके ,दिवाणी न्यायाधीश अर्जुनी( गोंदिया )विक्रम आव्हाड साहेब, न्यायाधीश बाळासाहेब पवार हिंगणघाट, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी ,मा सरपंच सुनील कोठारी ,कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष मधुकर आबा राळेभात ,उद्योगपती संजय नहार ,समर्थ हॉस्पिटलचे डॉक्टर भरत दारकुंडे ,विजय भोरकडे ,सचिन गाडे, दिगंबर चव्हाण ,दीपक भोरे ,आदित्य मंडलेचा आदी उपस्थित होते
अंकिता ही जवळा तालुका जामखेड येथील प्रदीप मंडलेचा यांची कन्या असून काही दिवसापूर्वी तिचे लग्न नाशिक येथील जैन परिवारात झाला तिचे मिस्टर आणि सासरे यांनी सुद्धा तिला परीक्षा देण्यास अभ्यास करण्यास परवानगी दिली आणि ती त्यामुळे पास झाली असे ती म्हणाली
यावेळी बोलताना जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यवान डोके म्हणाले तसे पाहता चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा सी.ए. होने सोपे नाही मी सुद्धा यातून गेलो आहे खरोखर अंकिता मंडलेचा हिने अभ्यास करून यश प्राप्त केले त्याबद्दल तिचे अभिनंदन करतो कठीण परिश्रम घेऊन ही परीक्षा लग्नानंतर पास होणे सोपे नाही याचा निकाल फार कमी प्रमाणात लागत असतो यावर्षी जामखेड तालुक्यातील जैन समाजाच्या दोन मुलीचे सी.ए. झाल्या त्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील शुभेच्छा दिल्या
यावेळी बोलताना अंकिता म्हणाली आज संजू काका कोठारी यांनी माझा सत्कार ठेवला विशेष म्हणजे या सत्कारासाठी तीन न्यायाधीश आणि तहसीलदार योगेश चंद्रे आणि सर्व मोठे पदाधिकारी होते त्यामुळे मी फार आभारी आहे.

No comments:

Post a Comment