अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थिनीची अडवणुक केल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषणाचा इशारा.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 24, 2023

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थिनीची अडवणुक केल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषणाचा इशारा..

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थिनीची अडवणुक केल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषणाचा इशारा..
नगरी दवंडी 
पारनेर - पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील विजयगंगा नर्सिंग कॉलेज मधील विद्यार्थीनी अंजली संभाजी करंदीकर या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थिनीला पुढील शिक्षण कामासाठी ओरिजनल शाळा सोडल्याचा दाखला विनंती करूनही कॉलेज प्रशासन आडमुठे धोरण अवलंबिले असल्याने दाखला देत नाही त्या मुळे कॉलेज प्रशासन विरोधात गुरुवार दि.२६रोजी पारनेर तहसील कार्यालय समोर विद्यार्थीनी कुटुंबासह आमरण उपोषणाचे आंदोलनं करणार आहे.
सदर निवेदनात म्हंटले आहे की, मी अंजली संभाजी करंदीकर रा. करंदी ता. पारनेर इयत्ता बारावी विज्ञान उत्तीर्ण अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थिनी आहे. लॉकडाऊन नंतर मी नर्सिंग करण्याचे ठरवले. व प्रवेशा साठी विजयगंगा नर्सिंग कॉलेज भाळवणी येथे गेले. सदर कोलेज मध्ये मी माझा शाळा सोडल्याचा दाखला व माझ्याकडे उपलब्ध असणारे इतर कागदपत्रे दिं ३० ऑगस्ट २०२१ रोजी जमा केली. आणि कॉलेजची पाच हजार फी भरली. त्या नंतर त्यांनी मला इतर कागद पत्र आणण्यासाठी कागद पत्राची यादी दिली. इतर कागदपत्रे आणल्या नंतर तुझे ऑनलाईन ऍडमिशन प्रक्रिया पुर्ण करण्यात येईल. आणि शिष्यवृत्तीचा अर्ज देखील भरला जाईल असे सांगीतले.
परंतु कोरोना महामारीचा प्रादुर्भाव व लॉकडाऊनचा प्रभाव आणि त्यातच एस टी महामंडळाचे कर्मचारी यांनी सुरू केलेले संपामुळे कॉलेजला जाणं येण्याच्या साधनांचा अभाव निर्माण झाला. तसेच माझे गाव कॉलेज पासुन २८किमी असल्याचे व एस टी महामंडळाचा संप बरेचं काळ चालल्याने मी कॉलेज ला जाऊ शकले नाही. त्या मुळे माझे सन २०२१ व २२ हे शैशनिक वर्ष वाया गेले. त्या मुळे मागील अनुभवाचा विचार करता. व लांब अंतरा मुळे मी सन २०२२व २३ या वर्षात पारनेर मध्येच प्रवेश घेउन पदवी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. पुढील शिक्षण कामासाठी माझा दाखला व इतर कागदपत्रे मिळवण्यासाठी विजयगंगा नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य यांच्या कडे २४/६/२०२२रोजी रीतसर अर्ज केला. परंतु विजयगंगा नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष डॉ किरण रोहकले व प्राचार्य यांनी मला माझी कागद पत्र देण्यास नकार दिला. तुझ्या मूळे आमची नर्सिंगची एक जागा रिक्त राहिली. आणि आमचे आर्थिक नुकसान झाले. जर तु प्रति वर्षी एक लाख पन्नास हजार प्रमाणे तीन वर्षाचे पैसे भरले तरच तुझे कागद पत्र देऊ अन्यथा देता येणार नाहीं असे सांगीतले. मी सतत विनंती केली पण त्यांनी माझे काहीही एकले नाही. व माझी कागदपत्रे दिली नाही. त्या मुळे माझे शौशनिक नुकसान झाले आहे.
 सदर बाब लेखी पत्राद्वारे मी संभदित अधिकारी व प्रशासन यांना कळविले, परंतु कोणीही माझी दखल घेतली नाही. माझ्या मोकळ्या वेळे मध्ये मी पोलीस अकादमी मध्ये भरती पूर्व प्रशिक्षण घेउन पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे. आता मला भरती प्रक्रिया साठी कागद पत्रांची आवश्यकता आहे. विजयगंगा नर्सिंग कॉलेजचे डॉ किरण रोहकले व थोरात सर यांच्या मुळे माझे जीवन उद्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्या मुळे मी नाईलाजस्तव भारतीय संविधान व कायदा आणि सुव्यवस्था अधीन राहून आंदोलनाचा मार्ग स्विकरला आहे. प्रशासनाने सदर प्रकरणात लक्ष घालून येत्या प्रजासत्ताक दिना पर्यंत माझे कागद पत्रे मला मिळून दिले नाहि तर मी प्रजासत्ताक दिनी गुरुवार दि.२६/१/२०२३ रोजी पारनेर येथील तहसील कार्यालय समोर माझ्या सर्व कुटुंबसह आमरण उपोषणाचे आंदोलनं सुरू करणार आहे. जो पर्यन्त माझे शालेय कागदपत्रे मला मिळत नाहीं तो पर्यन्त मी माझे आंदोलनं मागे घेणार नाही. त्या साठी मला प्राण त्याग करण्याची वेळ आली तरी चालेल. तरी सदर प्रकरणी ताबडतोब दखल घेउन मला न्याय द्यावा व माझे शैक्षनिक कागदपत्रे मला मिळून द्यावी हि नम्र विनंती या निवेदनावर विद्यार्थ्यांनीचे चुलते राजेंद्र शंकर करंदीकर, वडील संभाजी शंकर करंदीकर, आई करुणा संभाजी करंदीकर व अर्जदार अंजली संभाजी करंदीकर यांच्या सह्या आहेत. या बाबत निवेदन सहायक आयुक्त समाजकल्याण अहमदनगर, जिल्हा शल्य चिकीत्सक जिल्हा रुग्णालय, अहमदनगर , पोलिस अधीक्षक अहमदनगर पारनेर तहसिलदार, पारनेर पोलिस निरीक्षक यांना पाठविले आहेत.

No comments:

Post a Comment