अहमदनगरमधील खळबळजनक घटना! प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 7, 2023

अहमदनगरमधील खळबळजनक घटना! प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या.

अहमदनगरमधील खळबळजनक घटना! प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या.
अहमदनगर - तालुक्यातील जवखेडे खालसा जवळील कासारवाडी शिवारात एका प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
कृष्णा अशोक करजे (वय २५ रा. मठाचीवाडी, ता.शेवगाव) आणि नेवासा तालुक्यातील एका अलपवयीन मुलीचा यामध्ये समावेश आहे. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव मिरी रस्त्यावर कासारवाडी शिवारात एका पडीक खोलीमध्ये या प्रेमी जोडप्याने प्रेम प्रकरणाच्या कारणातून छताला वायरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.बारावीत शिकणारी अल्पवयीन मुलगी ही गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेली होती. कुटुंबातील नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. आज सकाळी मुलीचे वडील हे नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता मुलीच्या आत्महत्याची घटना कळाली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाथर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल्य राम निरंजन वाघ, पोलीस नाईक सचिन नवगिरे, राहुल तिकोणे आत्महत्या केलेल्या घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतले. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment