शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला भीषण अपघात… - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 7, 2023

शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला भीषण अपघात…

शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला भीषण अपघात…
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ हा अपघात घडला. या अपघातात आमदार योगेश कदम यांच्या चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. आमदार कदम सुदैवाने बचावले असून त्यांना किरकोळ मार लागल्याची माहिती मिळत आहे.
आमदार योगेश कदम हे माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे सुपूत्र आहेत. ते दापोली मतदारसंघाचे आमदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश कदम मुंबईच्या दिशेनं जात असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ एका भरधाव डंपरने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात कदम यांच्या वाहनाचा चक्काचूर झाला आहे.

No comments:

Post a Comment