नगरचे हे दोन अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 6, 2023

नगरचे हे दोन अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात.

 केंद्रीय उत्पादन शुल्काचे 2 अधिकारी सीबीआयच्या ट्रॅपमध्ये अडकले.


अहमदनगर :
केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अहमदनगर येथील केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक (वर्ग-एक) विजयकुमार राऊत (वय ५५) आणि निरीक्षक (वर्ग-दोन) मुरली मनोहर (वय २७) या दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्यासमोर दोघांना हजर केले असता, दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. 
अहमदनगर येथील एका उद्योजकाचा खाद्यतेलाचा व्यापार आहे. त्यांनी एका नामांकित कंपनीची एजन्सी घेतली आहे. त्यांनी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या अहमदनगर येथील किसान क्रांती बिल्डिंगमधील कार्यालयात ऑनलाइन नोंदणी अर्ज दाखल केला होता. कार्यालयाचे निरीक्षक मुरली मनोहर यांनी त्यांना अधीक्षक विजयकुमार राऊत यांना भेटण्यास सांगितले. राऊत यांनी ऑनलाइन अर्जामध्ये त्रुटी असल्याचे सांगत मनोहर यांना भेटा, असे सांगितले. त्यावर मनोहर यांनी अर्ज मंजूर करण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली. उद्योजकाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करून तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष सापळा लावला. तसेच एक हजाराची लाच स्वीकारताना मनोहर यास पकडले.

No comments:

Post a Comment