प्रसिद्ध ॲक्युपंक्चर तज्ञ अशोक खोस यांना राष्ट्रीय पातळी वरील पुरस्कार प्रदान. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 9, 2023

प्रसिद्ध ॲक्युपंक्चर तज्ञ अशोक खोस यांना राष्ट्रीय पातळी वरील पुरस्कार प्रदान.

प्रसिद्ध ॲक्युपंक्चर तज्ञ अशोक खोस यांना राष्ट्रीय पातळी वरील पुरस्कार प्रदान.
निघोज - लोकप्रिय रजिस्टर ॲक्युपंक्चर तज्ञ अशोक बाजीराव खोसे यांना नुकताच राष्ट्रीय पातळीवरील AIMA Acupuncture Star 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . 
 श्री खोसे पारनेर तालुक्यातील पाडळीदर्या एका शेतकरी कुटुंबातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून नोकरी करत शिक्षण घेऊन पुण्यात पिंपरी चिंचवड मध्ये ॲक्युपंक्चर थेरपीचे  क्लिनिक चालवतात.तसेच गावी पण रूग्णांवर मोफत उपचार करतात. त्यांनी करोना काळात अनेक रुग्णांना मोफत सेवा देऊन व घरगुती औषधांचा वापर करून ठीक केले व धीर दिला. असे मोठे कार्य त्यांनी केल्यामुळे त्या सर्व गोष्टींची आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनने दखल घेऊन त्यांना ए.आय.एम.ए  स्टार 2022 सदर अवॉर्ड  छत्रपती संभाजी महाराज नगर (औरंगाबाद) येथे केंद्रीय अर्थ राज्य मंत्री  डॉ . भागवत कराड स व जगप्रसिद्ध कायरो प्रॅक्टिस डॉ . रजनीश कांत यांच्या प्रमुख उपस्थित देण्यात आला .सन्मान व पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख मार्गदर्शक आमचे उपाध्यक्ष डॉ.नितीन राजे पाटील अध्यक्ष डॉ.सतीश कराळे डॉ. बाबुराव कानडे सौ.दिशा चव्हाण , श्री. दीनदयाळ तोष्णीवाल असे अनेक सर्व जिल्ह्यांचे पदाधिकारी व भारतातून अनेक व राज्यातील ॲक्युपंक्चर तज्ञ आले होते . त्यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
अशोक खोसे यांनी ॲक्युपंक्चर व निसर्गोपचार पद्धतीचा वापर करून अनेक रुग्णांना  आतापर्यंत बरे केलेले आहे. ते कानावरील विशिष्ट पॉईंट वर उपचार करून अनेक व्याधींपासून रुग्णांना बरे करतात ही पद्धती अत्यंत प्राचीन असून अलीकडे ती प्रसिद्ध होत आहे कारण या पद्धतीत कोणताही साईड इफेक्ट नाही व अत्यंत साधी व सोपी औषधाविना उपचार पद्धती असल्यामुळे रुग्णांना यापासून ताबडतोब आराम मिळतो व कोणताही साईड इफेक्ट होत नाही त्यामुळे अलीकडे सर्व रुग्णांचा कल या उपचार पद्धतीकडे वाढत चाललेला आहे.
श्री खोसे यांचे पत्रकार सुरेश खोसे पाटील, सप्रसिध्द शुभ तेज हेल्थ केअर सेंटरचे संचालक दिलीप खोसे पाटील  यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment