जेसीबी समोरील बकेट छातीला लागल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 9, 2023

जेसीबी समोरील बकेट छातीला लागल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू.

जेसीबी समोरील बकेट छातीला लागल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू.
सोलापूर‎ - घराच्या ड्रेनेजचे खड्डे बुजवण्यासाठी आणलेल्या जेसीबीच्या‎ बकेटचा छातीला धक्का लागून एक वयोवृद्ध महिला‎ मृत्युमुखी पडल्याची घटना मोहोळ तालुक्यातील खुनेश्वर‎ गावात रविवारी घडली.‎ सुमन सुखदेव जगताप (वय ६८, रा. मार्डी, ता. उत्तर‎ सोलापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या खुनेश्वर येथे‎ मुलीच्या सासरी आल्या होत्या.
रविवारी मुलीच्या‎ सासरी घराच्या ड्रेनेज कामाचे खड्डे बुजवण्यासाठी जेसीबी‎ आणला होता. यावेळी सुमन जगताप या घराच्या कट्ट्यावर‎ बसल्या असताना जेसीबीसमोरील बकेटचा धक्का त्यांच्या‎ छातीला लागला. त्यामुळे त्या जागेवर कोसळल्या. त्यांना‎ उपचाराकरिता येथील शासकीय रुग्णालयात मुलगा विलास‎ जगताप यांनी दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू‎ झाला आहे. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात‎ आली आहे.‎

No comments:

Post a Comment