कोरठण यात्रेची काठ्यांच्या मिरवणुकीने सांगता. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 9, 2023

कोरठण यात्रेची काठ्यांच्या मिरवणुकीने सांगता.

 कोरठण यात्रेची काठ्यांच्या मिरवणुकीने सांगता.

यात्रे काळात सात लाख भाविकांकडून खंडोबाचे दर्शन...


नगरी दवंडी
पारनेर - पिंपळगाव रोठा येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या वार्षिक यात्रोत्सवाची रविवारी यात्रेच्या मुख्य व शेवटच्या दिवशी ब्राम्हणवाडा ( ता. अकोले ) व बेल्हे  ( जि.पुणे ) येथील मानाच्या काठ्यांच्या मिरवणुकीनंतर या काठ्यांच्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत शासकीय महापुजेनंतर काठ्यांच्या  देवदर्शन व कळस दर्शनानंतर  इतर गावच्या मानाच्या काठ्यांच्या मिरवणुकीनंतर शांततेत व उत्साहात सांगता झाली ही यात्रा तीन दिवस साजरी झाली याकाळात सुमारे सात लाख भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले  भाविकांच्या  गर्दीचा उच्चांक रविवारी झाला सुमारे तीन ते चार लाख भाविक यात्रेच्या शेवटच्या दिवशी उपस्थित होते.
पहाटे पाच वा.रविवारी देवदर्शनाला सुरवात झाली  सकाळी खंडोबाची चांदीची पालखी व अळकुटी,बेल्हे,कांदळी, माळवाडी, सावरगांव घुले कासारे कळस येथील मानाच्या पालख्यांची मंदिर प्रदक्षिणा मिरवणूक सुरू झाली ही मिरवणूक दुपारी बाराच्या सुमारास मंदिरासमोर आल्यानंतर पालखी मानकर्याचा देवस्थानकडून सन्मान करण्यात आला दुपारी यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या बेल्हे व ब्राम्हणवाडा येथील मानाच्या  काठ्यांची शाही मिरवणूक सुरू झाली या मिरवणूकीत हजारो भाविकांची गर्दी झाली होती दुपारी चारच्या  सुमारास दोन्ही काठ्या मंदिरासमोर आल्यानंतर नायब  तहसिलदार गणेश आढारी व सुभाष कदम  व  पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या हस्ते काठ्यांची शासकीय महापुजा व महाआरती करण्यात आली या प्रसंगी , देवस्थानच्या अध्यक्षा शालिनी घुले उपाध्यक्ष महेश शिरोळे,खजिनदार तुकाराम जगताप,सचिव जालिंदर खोसे,विश्वस्त राजेंद्र चौधरी, चंद्रभान ठुबे,सुरेश फापाळे,रामदास मुळे,धोंडीभाऊ जगताप,कमलेश घुले,अजित महांडुळे, सुवर्णा घाडगे ,दिलीप घुले,महादेव पुंडे,माजी सरपंच अशोक घुले,सरपंच सुरेखा वाळुंज,चंद्रकांत कुलकर्णी यांच्या सह लाखो भाविकांचा जनसागर उपस्थित होता शासकीय महापुजा व महाआरतीनंतर ब्राम्हणवाडा काठीने देवदर्शन  तर बेल्हे काठीने कळस दर्शन  घेतले यानंतर इतर गावच्या मानाच्या काठ्यांच्या मिरवणुका पार पडल्या यात्रे दरम्यान  मुंबई, ठाणे, नाशिक, नगर, संगमनेर,जुन्नर,अकोले येथील मोठ्या संख्येने भाविक कोरठणला आले होते  सर्वाधिक भाविक पुणे जिल्ह्यातून आले होते यात्राउत्सवा दरम्यान पुणे जि.प.चे माजी अध्यक्ष पांडुरंग पवार,डाॅ.भास्कर शिरोळे ,स्मिता शिरोळे ,पारनेरचे नगराध्यक्ष विजय औटी,नगरसेवक योगेश मते,सुभाष शिंदे,तासगावचे सरपंच संतोष पवार,संतोष वाळुंज,पोपट सुपेकर,स्वप्निल जगताप,अमोल घुले,तान्हाजी मुळे,अमोल भांबरे,भगवान भांबरे,कारेगावचे सरपंच बापू ठुबे,साहेबराव चिकणे,गंगाराम कोळेकर आदींनी सहभाग घेतला रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने कोरठणला प्रचंड गर्दीचा उच्चांक झाल्याने पिंपळगाव रोठा गाव ते कोरठण देवस्थान पर्यत दुपारनंतर वाहतुकीची मोठी कोंडी झाली पोलिस निरिक्षक घनश्याम बळप यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता प्रांताधिकारी सुधाकर भोसले व तहसिलदार शिवकुमार आवळकंठे यांनी नेटके प्रशासकीय नियोजन केले संघर्ष  मित्र मंडळाने स्वयंसेवकाचे काम केले भाविकांच्या सोयीसाठी एस. टी. कडून जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या.आरोग्य विभाग, अग्निशमन दल यांनीही चोख व्यवस्था ठेवली होती.

No comments:

Post a Comment