संक्रांतीच्या संध्याकाळी पतंग उडवण्याच्या कारणावरून नगर शहरात दोन गटात या ठिकाणी दगडफेक.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 16, 2023

संक्रांतीच्या संध्याकाळी पतंग उडवण्याच्या कारणावरून नगर शहरात दोन गटात या ठिकाणी दगडफेक....

संक्रांतीच्या संध्याकाळी पतंग उडवण्याच्या कारणावरून नगर शहरात दोन गटात या ठिकाणी दगडफेक....
अहमदनगर-मकरसंक्रातीच्या दिवशीच सायंकाळी मंगलगेट परिसरासह घासगल्ली, दाणेडबरा, एसटी कर्मचारी वसाहत परिसरात दोन समाजाच्या गटात तुफान दगडफेक झाली. पतंगोत्सवादरम्यान लावण्यात आलेली गाणी, ढोल ताशे व झेंड्यावरून दुपारपासूनच दोन गटात कुरबुरी सुरू होत्या व त्याचेच पर्यवसान दगडफेकीत झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या दगडफेकीत चार वाहनांचे नुकसान झाले असून दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दोन संशयतांना ताब्यात घेतले आहे. घटनेचे मूळ कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, तोफखानाच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, भिंगारचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, नगर तालुक्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप आदींसह सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

No comments:

Post a Comment