फुलमाळी यांना धमकी देणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 14, 2023

फुलमाळी यांना धमकी देणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी...

फुलमाळी यांना धमकी देणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी...
जामखेड - मागिल काही दिवसांपुर्वी फीर्यादी म्हसु रामा फुलमाळी यास संबंधित आरोपींनी अपहरण करून मारहाण केली होती. मात्र एवढ्यावर आरोपी थांबले नसुन फीर्यादीस फोनवर धमकी देखील देत आहे त्यामुळे तिरमल विकास महासंघाच्या वतीने देखील आरोपींनवर कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे निवेदन दिले आहे. 
नंदिवाले तिरमल विकास महासंघाचे अध्यक्ष बाबुराव (काका) फुलमाळी यांनी सदरचे निवेदन दिले आहे. फीर्यादी म्हसु रामा फुलमाळी यास अपहरण करून डांबुन ठेवले होते. या नंतर फीर्यादी हा कसातरी जीव वाचुन घटनास्थळाहुन पळुन आला या प्रकरणी तीघांन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तरी देखील संबंधित आरोपी हे फीर्यादीस धमक्या देत आहेत नंदिवाले तिरमल विकास महासंघाच्या वतीने आरोपींनवर तात्काळ कारवाई करवी आशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे दिलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनावर महेश फुलमाळी व संस्थापक अध्यक्ष बाबुराव (काका) फुलमाळी यांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment