कालिका पोदार लर्न स्कूल जामखेडच्या विद्यार्थ्यांसाठी कोर्ट व्हिजिटचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 19, 2023

कालिका पोदार लर्न स्कूल जामखेडच्या विद्यार्थ्यांसाठी कोर्ट व्हिजिटचे आयोजन

कालिका पोदार लर्न स्कूल जामखेडच्या विद्यार्थ्यांसाठी कोर्ट व्हिजिटचे आयोजन.

विद्यार्थ्यांनी समजुन घेतली कायद्याची माहिती.
जामखेड - न्यायालयाचे कामकाज कसे चालते, लोकांना न्याय कसा मिळतो व वकील आपल्या पक्षकाराची बाजु कशी मांडतात यासह विद्यार्थ्यांना कायद्याची माहिती समजावी यासाठी कालिका पोदार लर्न स्कूल जामखेडच्या वतीने इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कोर्ट व्हिजिटचे आयोजन करण्यात आले होते. 
प्राचार्य प्रशांत जोशी यांच्यासह अविनाश खेडकर, तुषार संकपाळ, अ‍ॅलेक्स फिग्रेडो इतर यांनी कायदा व्यवहारात कसा कार्य करतो याचा अभ्यासपूर्ण अनुभव घेऊन विद्यार्थ्यांना मिळालेले सैद्धांतिक ज्ञान यास मदत करण्यासाठी याचे आयोजन केले होते.
विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी न्यायालयाची भूमिका समजून घेण्यासाठी या भेटीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांना न्यायालयीन कामकाजाचे थेट काम पाहण्यात आले;  फौजदारी खटल्यांमध्ये सरकारी वकिलाची भूमिका, न्यायाधीश, अभियोक्ता आणि बचाव पक्षाचे वकील खटले कसे हाताळतात, न्यायालयाचे कामकाज कसे चालते यासह न्यायालयाची विविध माहीती विद्यार्थ्यांना देण्यात आली. 
न्यायाधीश श्री. रजनीकांत जगताप व इतर अधिवक्त्यांशी विद्यार्थ्यांची ओळख करून देण्यात आली.  विद्यार्थ्यांनी अर्धा तास न्यायाधीशांशी संवाद साधून त्यांनी सांगितलेले ज्ञान आणि अनुभव मिळवले. या वेळी ॲड हर्षल डोके, ॲड. नागरगोजे, ॲड. गोले ॲड बोलभट ॲड रोहीत काळे ॲड पप्पू थोरात, उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment