सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे कार्य कौतुकास्पद जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यवान डोके..... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 17, 2023

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे कार्य कौतुकास्पद जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यवान डोके.....

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे कार्य कौतुकास्पद  जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यवान डोके.....
जामखेड - जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड आयोजित जय भवानी सामजिक व सांस्कृतीक संस्था,पिंपळगाव जलाल (येवला )ते अहमदनगर, जामखेड, खर्डा, येरमाळा, तुळजापूर , अक्कलकोट, गाणगापूर सायकल यात्रेचे( वर्ष १७ वे) स्वागत समारंभाच्या वेळी जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यवान डोके बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेडचे तहसीलदार योगेशजी चंद्रे साहेब  होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री विक्रम आव्हाड साहेब, दिवाणी न्यायाधीश क.स्त. व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, सडक अर्जुनी, जि. गोंदिया,सत्यवान डोके,
जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, बीड, बाळासाहेब पवार न्यायाधीश हिंगणघाट,
 मधुकरआबा राळेभात कर्जत जामखेड विधानसभा विधानसभा अध्यक्ष ,संजयजी नहार प्रसिद्ध उद्योगपती जामखेड ,डॉक्टर भरत दारकुंडे समर्थ हॉस्पिटल जामखेड, श्री. विजय भोरकडे अध्यक्ष अध्यक्ष जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था पिंपळगाव जलाल हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यवान डोके म्हणाले सायकल चालवणे ही एक कलाच आहे महत्त्वाचे म्हणजे काल ११४ किलोमीटर हे सर्व सायकल स्वार सायकल येवला ते अहमदनगर आले आणि आज ८०किलोमीटर जामखेड पर्यंत आले खरोखर खूप धन्यवाद देतो असे ते म्हणाले तसे पाहता संजय कोठारी हे माझे मित्रच आहेत लहानपणापासून त्यांच्या सर्व कार्यक्रमाला मी उपस्थित राहत होतो आणि त्यांचे कार्य खरोखर उल्लेखनीय आहे असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना न्यायाधीश विक्रम आव्हाड साहेब म्हणाले गेली सोळा वर्षापासून आम्ही जामखेडला येत आहोत आज आमचे १७ वे वर्ष आहे पहिल्या वेळेस पासून आम्हाला सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी मदत केली आणि आमचा सत्कार समारंभ करतात त्यांचं कार्य मी नेहमी पाहत असतो कोरोना काळामध्ये त्यांनी जनावरांना सुद्धा चारा देऊन मोठे काम केले कोरोणा काळामध्ये त्यांनी घाटातील अपघातातील लोकांना वाचवले त्यांनी कोरोना काळामध्ये सर्वांना मदत केली स्वतः खूप मोठे काम केले आहे त्यांची स्तुती करणे एवढा मी मोठा नाही परंतु खरी परिस्थिती असल्यामुळे आज मला बोलाव लागले.
यावेळी बोलताना न्यायाधीश बाळासाहेब पवार म्हणाले मी सध्या हिंगणघाटला असून माझा पहिलाच प्रवास आहे पहिल्या दिवशी मी ११४ किलोमीटर चाललो आज ८० किलोमीटर क्लीन करत मी यांच्या बरोबर आलो मला कसलाच त्रास झाला  नाही ही या लोकातून मला प्रेरणा मिळाली कोठारी प्रतिष्ठानने माझा सत्कार केला आम्हाला बोलावलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे
तसेच यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले संजय कोठारी यांचे काम मी आल्यापासून पाहत आहे मागच्या वर्षी पण त्यांच्या शोरूम मध्ये हा कार्यक्रम झाला होता मी ज्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला येण्याचा प्रयत्न करत असतो समाजकार्य काय असतं ते संजय कोठारी यांच्याकडून शिकायला पाहिजे आज आलेल्या सर्व सायकल स्वरांना मी शुभेच्छा देतो तसेच जगात सर्वात मोठे जिजाऊ जिजामाता रेखाचित्र तयार करणारे उद्देश पघळ, तसेच जामखेड तालुक्यामध्ये जवळा येथील अंकिता मंडलेचा जैन सी.ए. परीक्षेत पास झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला
यावेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी ,सुनील कोठारी ,सुभाष भंडारी, कुंदनमल भंडारी, किसन चिंतामणी, दिगंबर चव्हाण अमित जाधव, अशोक निमोणकर ,नासिरभाई पठाण ,सचिन गाडे, दीपक भोरे, मयूर भोसले, आदित्य मंडलेचा, रोहन  कोठारी ,उपस्थित होते.
गेली सतरा वर्षापासून उच्चशिक्षित डॉ. विक्रम आव्हाड (न्यायाधीश साहेब) हे येत आहेत दोन वर्षापासून ते सपत्नीक या सायकल रॅलीमध्ये असतात हे प्रत्येक वेळेस वृक्षारोपण करून लोकांना वृक्षारोपांचे महत्त्व पटवून सांगतात तसेच सायकल रॅलीमुळे प्रदूषण होत नाही इंधन कमी लागते आणि शारीरिक व्यायाम होतो हे सुद्धा यातून कळून येते
 या कार्यक्रमाचे नियोजन जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठान यांच्या मार्फत जामखेड महावीर भवन येथे सोमवार दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदनमल लालचंद भंडारी यांनी केले तर आभार संजय कोठारी यांनी मानले.

No comments:

Post a Comment