रस्त्यावरून जाताना ''भाई म्हटले नाही'' म्हणून डोक्यात रॉड घातल्याचा धक्कादायक प्रकार.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 7, 2023

रस्त्यावरून जाताना ''भाई म्हटले नाही'' म्हणून डोक्यात रॉड घातल्याचा धक्कादायक प्रकार..

 रस्त्यावरून जाताना ''भाई म्हटले नाही'' म्हणून डोक्यात रॉड घातल्याचा धक्कादायक प्रकार..


पुणे :
गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात दहशत निर्माण करण्यार्‍या टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत. असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कारण रस्त्याने जाताना ओळख दाखवत असताना ’भाई’ म्हटलं नाही म्हणून तरुणाच्या डोक्यात रॉड घातल्याचा प्रकार पुण्यातील नवी खडकीतील शिवाजी पुतळा चौक येथे घडला आहे. याप्रकरणी संतोष साळवे (वय 36, रा. यशवंतनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संतोष साळवे यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी प्रफुल्ल ऊर्फ कान्या सोनवणे (वय 30, रा. नवी खडकी), संकेत मारे ऊर्फ मेड्या (रा. यशवंतनगर, येरवडा) आणि सोनु मारे या तिघांना अटक केली आहे. अटकेतील तिघे आणि महेश सुरेश पवार अशा चौघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही पोलिसांकडून दाखल केला आहे. हा प्रकार 4 जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष साळवे हे जिममध्ये व्यायाम करुन दुचाकीवरुन घरी जात होते. याचवेळी चौकात त्यांच्या ओळखीचे काही जण थांबले होते. तेव्हा संतोष याने प्रफुल्ल सोनवणे याला काय पप्या काय चालले आहे? असे विचारले. तेव्हा जवळच उभा असलेल्या संकेत मोरे याने फिर्यादी याला थांबवून ’काय तुला लय मस्ती आली आहे का ? तुला भाई बोलता येत नाही का? तू लय मोठा भाई झाला का?’ असे बोलून शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.
संकेत मोरे याने संतोषच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले आणि त्याचा मोबाईल फोडला. इतर लोक भांडणे सोडवण्यासाठी येत असताना त्यांनी हवेत लोखंडी रॉड फिरवून लोकांना ’तुम्ही इथे थांबू नका, याला आम्ही जिवंत सोडणार नाही’, असे म्हणून दहशत निर्माण केली.
दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक शेलार पुढील तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment