पिस्तुलाचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 10, 2023

पिस्तुलाचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार....

 पिस्तुलाचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार....


पुणे :
पिस्तुलाचा धाक दाखवून दिल्लीजवळील एका महिलेवर पुण्यात बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी संजय बाजीराव भोसले (वय 52 वर्ष, रा. उरुळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) याला अटक केली आहे.
मूळची गाझियाबाद येथील असलेल्या 39 वर्षीय महिलेच्या फिर्यादीनंतर संजय भोसले याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात बलात्कार, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मूळची दिल्लीजवळील गाझियाबादची रहिवासी आहे. पीडित महिलेला मणक्याच्या विकार आहे. महिलेला निसर्गोपचार केंद्रात उपचार घ्यायचे असल्याने ती उरुळी कांचन परिसरातील निसर्गोपचार केंद्रात उपाचारासाठी आली होती. यासाठी ती राहण्यासाठी खोली भाड्याने शोधत होती. यातूनच एका व्यक्तीमार्फत तिची ओळख आरोपी संजय भोसले याच्याशी झाली.
संजय भोसले हा महिलेला खोली दाखवण्याची बतावणी करत होता. त्यानुसारच भोसले महिलेला हडपसर भागात खोली दाखवण्याच्या बहाण्याने एका सोसायटीमध्ये घेऊन गेला. याच ठिकाणी भोसलेने महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
तर, या घटनेची माहिती कोणाला दिल्यास जिवे मारू, अशी धमकी त्याने महिलेला दिली. घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला. आरोपी भोसलेला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले तपास करत आहेत.


No comments:

Post a Comment