दहशत करणार्‍या आरोपीला गावठी कट्ट्यासह रंगेहाथ पकडले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 10, 2023

दहशत करणार्‍या आरोपीला गावठी कट्ट्यासह रंगेहाथ पकडले.

 दहशत करणार्‍या आरोपीला गावठी कट्ट्यासह रंगेहाथ पकडले,पारनेर पोलीसांची कारवाई.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

पारनेर ः आरोपी संतोष उर्फ पप्पू भिमाजी खोसे रा. वडगाव सावताळ व त्याचा एक साथीदार अशांनी तक्रारदार अरुण गणपत दाते रा.वासुंदे ता. पारनेर जि.अहदनगर यांचे पत्नीने आरोपी विरुध्द तक्रार का दिली म्हणून पिस्तुल दाखवुन पिस्तुलातून गोळया घालुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली त्याच दिवशी सायंकाळी आरोपी संतोष उर्फ पप्पू भिमाजी खोसे हा त्याचे साथीदारासह पुन्हा फिर्यादीचे घरात जावुन फिर्यादीस पिस्तुल दाखवुन पुन्हा दमदाटी केली. पारनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होता.

गुन्हा घडल्या पासुन आरोपी हा फरार झाला होता. दिनांक 06/01/2023 रोजी आरोपी हा त्याचे राहते घरी आल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने सापळा लावुन आरोपीस ताब्यात घेण्यात आले. त्याचे साथीदाराचे नाव बाबत विचारले असता त्याने गुन्हा करतेवेळी त्याचे सोबत विकास सुरेश रोकडे रा. वडगाव सावताळ ता.पारनेर हा असल्याची कबुली दिली. तसेच गावठी पिस्तुला बाबत विचारले असता उडवा उडवीची उत्तरे दिली परंतु त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल चौकशी करता त्याने गुन्हयात वापरलेले एक गावठी पिस्तुल व 3 जिवंत राउंड काढुन दिल्याने ते मेमोरंडम पंचनामा करुन जप्त केले आहेत. गुन्हयाचा पुढील तपास विलास लोणारे हे पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांचे सुचना व मार्गशर्दनाखाली करत आहेत

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक, अहमदनगर राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक अहमदनगर प्रशांत खैरे, यांचे मार्गदर्शनाखाली अजित पाटील उप विभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर व पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांचे सुचने प्रमाणे जालिंदर लोंढे, विलास लोणारे, गहीणीनाथ यादव, सुधीर खाडे, राम मोरे, सुरज कदम, सत्यजित शिंदे यांचे पथकाने केली आहे.

No comments:

Post a Comment