जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाप्रकरणी.... अज्ञात इसमावर खून करुन पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, January 9, 2023

जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाप्रकरणी.... अज्ञात इसमावर खून करुन पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल.

 जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाप्रकरणी.... अज्ञात इसमावर खून करुन पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल.


अहमदनगर -
वांबोरी फाटा परिसरात शनिवारी जळालेल्या अवस्थेत अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलदार रमेश थोरवे यांनी फिर्याद दिली आहे.शनिवारी सकाळी वांबोरी फाटा परिसरातील बाळासाहेब गणपत मिस्कीन यांच्या शेतात एका बॅगमध्ये 18 ते 20 वर्षीय युवकाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठविला होता.
शवविच्छेदन झाल्यानंतर त्या युवकाचा खून झाल्याचे समोर आले. त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मयत युवकाची ओळख अद्यापही पटलेली नाही. गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन तर एमआयडीसी पोलिसांची दोन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील पोलिस ठाण्यासह शेजारी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यातील हरवलेल्या युवकांविषयी माहिती संकलित करण्यात येत आहे. युवकाची ओळख पटल्यानंतरच त्याच्या खुनाचा उलघडा होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here