अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून सोशल मीडियावर केले फोटो व्हायरल.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, January 29, 2023

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून सोशल मीडियावर केले फोटो व्हायरल..

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून सोशल मीडियावर केले फोटो व्हायरल..
हिंगोली येथे एका अल्पवयीन मुलीस कारमध्ये बसवून तिचा विनयभंग केला तसेच एका कॅफेमध्ये नेऊन बळजबरीने कॉफी पाजून काढलेले छायाचित्र सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड करणाऱ्या तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी (२९ जानेवारी) गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, एक अल्पवयीन मुलगी १६ जानेवारी रोजी महाविद्यालयात गेली होती. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास फरदिन शेख, त्याचा मित्र उजेर व वसीम यांनीमहाविद्यालयाजवळ येऊन त्या मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर तिला बळजबरीने कारमध्ये बसवून गणराज कॅफेमध्ये नेऊन जबरदस्तीने कॉफी पाजली व तिच्यासोबत सेल्फी काढली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here