अल्पवयीन मुलीचे अपहरण करून‎ जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार‎.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 30, 2023

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून‎ जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार‎..

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून‎ जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार‎.
शेतात काम करत‎ असलेल्या एका १७ वर्षीय मुलीचे‎ दुचाकीवर अपहरण करून तिला जीवे‎ मारण्याची धमकी दिली. त्यानंतर‎ मुलीवर अत्याचार करण्यात आला. पीडितेच्या तक्रारीवरून धारणी‎ पोलिसांनी २९ जानेवारीला‎ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.‎ शालिकराम काळमा भुसूम (२५,‎ रा. फॉरेस्ट मालूर, ता. धारणी) असे‎ गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव‎ आहे. शनिवारी दुपारी पीडित १७ वर्षीय‎ मुलगी ही शेतात काम करत होती.
यावेळी शालिकराम हा तिच्याजवळ‎ गेला. तुला घरी सोडून देतो, असे‎ म्हणून शालिकरामने पीडित मुलीला‎ दुचाकीवर बसविले. परंतु, त्याने‎ मुलीला घरी सोडून न देता त्याच्या‎ एका नातेवाईकाच्या घरी घेऊन गेला.‎ त्या ठिकाणी त्याने मुलीला जिवे‎ मारण्याची धमकी देऊन मुलीवर‎ अत्याचार केला. त्यानंतर‎ शालिकरामने पीडित मुलीला सोडून‎ दिले. पीडित मुलीने घर गाठून‎ आपबीती कुटुंबीयांसमोर कथन केली.‎ त्यानंतर धारणी पोलिसात तक्रार दिली.‎

No comments:

Post a Comment