कर्ज फेडा अन्यथा वेश्याव्यवसाय करायला लावू.. या गावातील सावकाराची महिलांना धमकी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 30, 2023

कर्ज फेडा अन्यथा वेश्याव्यवसाय करायला लावू.. या गावातील सावकाराची महिलांना धमकी.

कर्ज फेडा अन्यथा वेश्याव्यवसाय करायला लावू.. या गावातील सावकाराची महिलांना धमकी.


कोल्हापूर :
 कोल्हापुरात सावकाराच्या दादागिरीचा एक नवा प्रकार समोर आला आहे. कोल्हापूरच्या वडगणे गावातील एका कुटुंबाला गेल्या आठवड्याभरापासून सावकारांकडून दमदाटी आणि मारहाण होत असून कर्ज फेडा अन्यथा वेश्या व्यवसायाला लावू अशा प्रकारची धमकी सावकाराने एका पीडित कुटुंबाला दिली आहे. या प्रकरणी पीडित कुटुंबाकडून पोलिसात तक्रार करूनही पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कुटुंबाना केलेला आहे.
सावकारांच्या विरोधात राज्य सरकारने तीव्र मोहीम आखलेली असताना पुरोगामी कोल्हापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूरच्या वडगणे गावातील एका कुटुंबाला गेल्या आठवड्याभरापासून जवाहर नगर येथील एका सावकारांकडून दमदाटी आणि मारहाण होत आहे. सदर कुटुंबाने घर बांधण्यासाठी सावकाराकडून २५ लाखांचं कर्ज घेतलं होतं. मात्र आता या बदल्यात सावकार ८५ लाखाची मागणी करत असल्याची तक्रार पीडित कुटुंबांना केली आहे.
पैसे द्या अन्यथा महिलांना वेश्या व्यवसाय करायला लावू, अशी धमकी दिल्याचा आरोपही या कुटुंबाने सावकारावर केला आहे. तर सावकारांना कर्ज वसुलीच्या नावाखाली पिडीत कुटुंबीयांची कार सुद्धा ताब्यात घेतली असून त्यांचं घर आपल्या नावावर केलं आहे. या घरातून बाहेर पडा अन्यथा महागात पडेल अशा धमक्या सावकाराने पीडित कुटुंबाला दिल्या आहेत. एवढंच नाही तर दररोज पुरुष आणि महिला गुंडांना पाठवून घरातील साहित्य बाहेर फेकण्याचा प्रकारही या सावकाराने सुरू केला आहे.
याप्रकरणी सदर पीडित कुटुंबाने पोलिसांत तक्रार केली असून तरीही पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. पोलिसांकडून उद्या बघू.. असं सारखं उत्तर मिळत आहे. त्यामुळे आता हे कुटुंब थेट पोलिस अधीक्षकाकडे न्याय मागण्यासाठी जात आहेत. या प्रकरणी आता महिला संघटना आक्रमक झाल्या असून त्या महिलेच्या बाजूने आवाज उठविण्याच्या तयारीत आहेत. हा सर्व प्रकार गेल्या अठवड्याभरापासून सुरू असून आठवडाभर हे संपूर्ण कुटुंब प्रचंड दहशतीखाली आहे.
असे असले तरी गावातील नागरिक आणि सरपंच सावकारला घाबरून मदत करायला पुढे येत नाहीयेत. अनेक लोकांना महिलेने मदत मागितली मात्र सावकाराच्या भीतीपोटी कुणी समोर यायला तयार नाहीयेत.

No comments:

Post a Comment