नगर-कल्याण रोडवर भरदिवसा घरफोडी.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, January 13, 2023

नगर-कल्याण रोडवर भरदिवसा घरफोडी....

कल्याण रोडवर भरदिवसा घरफोडी....
अहमदनगर – अहमदनगर शहराजवळील नगरकल्याण रोड परिसरात असलेल्या व्यंकटेश रेसिडेन्सी या अपार्टमेंट मधील फ्लॅट अज्ञात चोरट्याने भरदिवसा फोडून सोन्या-चांदीचे दागीने व रोख र क्कम असा 1 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना काल (दि.12) दुपारी 12.30 ते सायंकाळी 5 या कालावधीत घडली. याबाबत वैशाली सिताराम पेगड्याल (रा.व्यंकटेश रेसिडेन्सी, हराळ हॉस्पिटल मागे, कल्याण रोड) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे कुटुंंबिय फ्लॅटच्या दरवाज्याला कुलूप लावून बाहेर गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत बेडरुम मधील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागीन व रोख र क्कम चोरुन नेली. सायंकाळी पेगड्याल कुटुंबिय घरी आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी रात्री तोफखाना पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.क. 454, 380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here