या गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या बोगस सभासदांची होणार चौकशी... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 13, 2023

या गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या बोगस सभासदांची होणार चौकशी...

या गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या बोगस सभासदांची होणार चौकशी...
गुंडेगाव -  नगर तालुक्यातील गुंडेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी नंबर-१ संस्थेतील २६२ सभासदांच्या नावे गुंठाभर जमीन नसतानाही सोसायटीचे बोगस सभासद करण्यात आले आहेत अशी तक्रार अहमदनगर  सहाय्यक उपनिबंधक व महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ,सहकार मंत्रालय सचिव यांच्याकडे सोसायटीचे सभासद व सन २०२२ निवडणुकीत रामेश्वर शेतकरी विकास पॅनलचे तेरा पराभूत उमेदवारांनी केली आहे. 
        मागिल महिन्यांत विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्थेचे जिल्हा सहाय्यक निबंधक यांच्याकडे गुंडेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी नं.१ मधील बेकायदेशीर २६२ सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यासाठी  तक्रार अर्ज दाखल केला आहे. या तक्रारीनुसार मतदार यादीतील जवळपास अनेक सभासदांकडे १० आर क्षेत्र नसल्याचे समोर आले आहे.
तरीही सदर सभासद हे सोसायटीचे बेकायदेशीर सभासद असुन त्यांची नावे मतदार यादीत आलेले आहेत. त्यामुळे सदर सभासद हे बेकायदेशीर असून कायद्यास धरून नाही. त्यामुळे ते रद्द होण्यास पात्र होऊ शकतात. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ११ व २५ मधील तरतुदीस अनुसरून कार्यवाही करून यादीतील नमुद १० गुंठे शेतजमीन नसलेल्या सभासदांचे सभासदत्व रद्द करावे अशी मागणी करण्यात आली आहे.बोगस सभासद रद्द होतील का? याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.त्यामुळे तक्रार दाखल झाल्यानंतर गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे बेकायदेशीर  सभासदांच्या तक्रारी कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment