नगरमधील शिवसैनिकांच्या पाठिशी मोठी ताकद उभी करु - आ.सुनिल शिंदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 14, 2023

नगरमधील शिवसैनिकांच्या पाठिशी मोठी ताकद उभी करु - आ.सुनिल शिंदे

 नगरमधील शिवसैनिकांच्या पाठिशी मोठी ताकद उभी करु - आ.सुनिल शिंदे

नेप्ती नाका चौक येथे शिवसेना शाखा व जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.


नगर -
शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत ते सोडविले आहे. प्रश्न सुटत असल्याने शिवसेनेवर नागरिकांचा मोठा विश्वास आहे. हाच विश्वास सेनेच्या प्रत्येक शाखेतून दिसून येतो. आज उद्घाटन होत असलेल्या शाखा व संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळेल ही खात्री आहे. नगरमध्ये स्व.अनिलभैय्या राठोड यांनी सेनेचे मोठे काम करुन नागरिकांचे प्रेम व विश्वास संपादन केला होता. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयार झालेले हे शिवसैनिक आज जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटत आहेत. अनिलभैय्यांचे कार्य संपर्कप्रमुख या नात्याने यापुढे आपण सुरु ठेवणार असून, येथील शिवसैनिकांच्या पाठिशी मोठी ताकद उभी करु. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला पुर्नवैभव प्राप्त करुन देण्याची जबाबदारी ही शिवसैनिकांची आहे. नगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे, आणि यापुढेही राहील, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनिल शिंदे यांनी केले.

नेप्ती नाका चौक येथे शिवसेना शाखा व उपशहरप्रमुख संदिप दातरंगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नगर जिल्हा संपर्क प्रमुख आ.सुनिल शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, उपशहरप्रमुख संदिप दातरंगे, माजी नगरसेवक अर्जुन दातरंगे, नगरसेवक सचिन शिंदे, गणेश कवडे, अनिल बोरुडे, बाळासाहेब बोराटे, गिरिष जाधव, प्रशांत गायकवाड, योगीराज गाडे, दत्ता जाधव, अशोक दहिफळे, संग्राम कोतकर, प्रताप गडाख, पारुनाथ ढोकळे, गौरव ढोणे, संतोष गेनप्पा, श्रीकांत चेमटे, मुन्ना भिंगारदिवे, बाळासाहेब जरे, संजय आव्हाड, दिपक आडेप, पप्पू भाले, दिपक कावळे, रमेश खेडकर, आशा निंबाळकर, अरुणा गोयल, शाखाप्रमुख संकेत आगरकर, उपशाखाप्रमुख गणेश सुडके आदि उपस्थित होते.

याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले, नगर शहर आणि शिवसेना हे समिकरण गेल्या अनेक वर्षांपासून आहे. जनसामान्याचे प्रश्न सोडवून त्यांच्या सुख-दु:खात शिवसैनिक नेहमीच सहभागी झाला आहे. प्रत्येक शाखेच्या माध्यमातून  जनतेला न्याय देण्याचे काम होत आहे. आज शुभारंभ झालेल्या उपशहरप्रमुख संदिप दातरंगे यांच्या संपर्क कार्यालय व शाखेच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी संदिप दातरंगे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नागरिकांच्या संपर्कात राहण्यासाठी या कार्यालयाचा 24 तास उपयोग होईल. तसेच शाखेच्या माध्यमातून पक्ष कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहचविले जाईल, असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले तर आभार संकेत आगरकर यांनी मानले. कार्यक्रमास शरद ठाणगे, देवराम मेहेत्रे, निलेश दातरंगे, संतोष जगताप, मनोज पवार, दत्ता दातरंगे, सुनिल दातरंगे, सुनिल सुडके, गणेश सुडके, अमोल दातरंगे, ठकाराम दातरंगे, भिमराज दातरंगे, अशोक दातरंगे, अशोक दातरंगे, बाळासाहेब दातरंगे, हेमंत पोकळे, विकास मुनोत, सनी आगरकर, गिरीराज धारक, शुभम दातरंगे, आकाश दातरंगे, शरद दातरंगे, योगेश दातरंगे, शंकर ठाणगे, सागर दातरंगे, राजमल मुनोत आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment