हळदी-कुंकू कार्यक्रमातून गोडवा निर्माण होतो - नगरसेवक डॉ.सागर बोरुडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, January 29, 2023

हळदी-कुंकू कार्यक्रमातून गोडवा निर्माण होतो - नगरसेवक डॉ.सागर बोरुडे

 हळदी-कुंकू कार्यक्रमातून गोडवा निर्माण होतो - नगरसेवक डॉ.सागर बोरुडे

भिस्तबाग चौक येथे नगरसेवक डॉ.सागर बोरुडे यांच्यावतीने हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न.


नगर -
आपल्या राज्यामध्ये सण उत्सवाच्या माध्यमातून संस्कृती व परंपरेचा ठेवा जोपासला जातो यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात सण साजरे करावे मकर संक्रांती निमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमाला एक मोठे महत्त्व आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मनुष्य चंद्रावर गेला आहे. आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहे. संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन सांस्कृतिक,धार्मिक तसेच सन परंपरेनुसार साजरे करावेत हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला एकत्रित येऊन आपल्या विचाराची देवाणघेवाण करत असतात यासाठी भिस्तबाग चौक येथे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महिलांसाठी विविध स्पर्धेचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून व्यासपीठ निर्माण करून दिले होते. या हळदी कुंकू कार्यक्रमांमध्ये परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला असल्याचे प्रतिपादन नगरसेवक डॉ.सागर बोरुडे यांनी केले.
भिस्तबाग चौक इथे मकर संक्रांती सणानिमित्त नगरसेवक डॉ.सागर बोरुडे यांच्यावतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, तोफखाना पोलीस स्टेशन निरीक्षक ज्योतीताई गडकरी,नगरसेविका दिपालीताई बारस्कर,नगरसेविका मीनाताई चव्हाण, डॉ.अश्विनी बोरुडे, डॉ. सोनल बोरुडे, मृतिका दरेकर, कांचन इंगवले, रंजना उकिरडे, रोहिणी अंकुश, माया शिंदे, अनिता हिलगुडे, संगीता कराळे, टीना पंडित, सुरेखा फुलपगार, वैशाली राजहंस, हेमलता कांबळे, भोसले ताई,काकडे ताई, आधी उपस्थित होते.
तोफखाना पोलीस स्टेशन निरीक्षक ज्योतीताई गडकरी म्हणाल्या की,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारे खुली करून दिल्यामुळे आज महिला सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवत आहे तसेच आपल्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असतात. याचबरोबर आपल्या कुटुंबातील बालकांवर संस्कार घडविण्याचे काम करत असतात हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून एकमेकी मध्ये ऋणानुबंध निर्माण होत असतात आपल्याला मिळालेला वारसा जोपासत महिला मोठ्या उत्साहात हळदी-कुंकू कार्यक्रमांमध्ये भाग घेत आहे असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here