बोरुडे परिवाराने हळदी कुंकू कार्यक्रमातून संस्कृतीचे व परंपरेचे जतन केले - अभिनेत्री गिरीजा प्रभू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, January 29, 2023

बोरुडे परिवाराने हळदी कुंकू कार्यक्रमातून संस्कृतीचे व परंपरेचे जतन केले - अभिनेत्री गिरीजा प्रभू

 बोरुडे परिवाराने हळदी कुंकू कार्यक्रमातून संस्कृतीचे व परंपरेचे जतन केले - अभिनेत्री गिरीजा प्रभू

मनपा महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पाताई अनिल बोरुडे परिवाराच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न.


नगर -
महाराष्ट्र राज्याला संस्कृतीची परंपरा मोठी लाभलेली आहे. तिचे जतन करण्याचे काम आजच्या युवा पिढीवर येऊन ठेपलेले आहे. प्रत्येकाने आपले सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले पाहिजे बोरुडे परिवाराच्यावतीने मकर संक्रांति सणानिमित्त महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करून स्नेहबंध जोपासण्याचे काम केले आहे. या माध्यमातून महिला एकत्रित येऊन आपल्या विचाराची देवाणघेवाण करता येते महिलांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती लावून हळदी-कुंकू कार्यक्रमाची परंपरा मोठ्या उत्साहात साजरी केली मा. उपमहापौर अनिल बोरुडे यांनी प्रभागातील नागरिकांचा विश्वास संपादन केल्यामुळेच महिलांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. असे प्रतिपादन सिने अभिनेत्री गिरीजा प्रभू यांनी केले.
बोरुडे मळा येथे मकर संक्राती सणानिमित्त मनपा महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पाताई अनिल बोरुडे परिवाराच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिने अभिनेत्री गिरीजा प्रभू, महापौर रोहिणी ताई शेंडगे, नगरसेविका शितलताई जगताप, मा.महापौर सुरेखा कदम, तोफखाना पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ज्योतीताई गडकरी, नगरसेविका सुवर्णा जाधव, अश्विनी जाधव, आशाताई कराळे, किरण संपत बारस्कर, सरलाताई बाबासाहेब वाकळे,आशाताई डागवाले,शोभाताई बोरकर, ज्योतीताई गाडे रूपाली वारे, संध्या पवार, वंदना ताठे, सविता शिंदे, नळकांडे ताई, गोयल ताई, अश्विनी बोरुडे, कावेरी बोरुडे, मीनाक्षी बोरुडे, मंगल बोरुडे, प्रियंका फुलसौंदर, संदीप बोरुडे आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महापौर रोहिणी ताई शेंडगे म्हणाल्या की, मा.उपमहापौर अनिल बोरुडे व मनपा महिला बालकल्याण समिती सभापती पुष्पाताई बोरुडे यांनी प्रभागाच्या विकास कामांबरोबर विविध सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे करत असतात आपल्याला लाभलेला वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम ते करत आहे पुढच्या पिढीला आपले सण उत्सव साजरे कसे करावे याची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून केली जाते असे त्या म्हणाल्या.
नगरसेविका शितलताई जगताप म्हणाला की, बोरुडे मळ्यातील साजरे होत असलेले विविध कार्यक्रम म्हणजे प्रभागातील नागरिकांसाठी एक पर्वणी आहे. लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या माध्यमातून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम होत आहे बोरुडे परिवाराचा सामाजिक वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम सभापती पुष्पाताई बोरुडे करत आहे असे त्या म्हणाल्या.
सभापती पुष्पाताई बोरुडे म्हणाल्या की, बोरुडे परिवाराच्यावतीने मकर संक्राती सणानिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये मराठी लावणी व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महिलांसाठी लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन करून भव्य अशी आकर्षक बक्षिसे देण्यात आली विकास कामाबरोबर वर्षभर विविध सामाजिक उपक्रम सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आमचे कर्तव्य आम्ही पार पाडत आहे प्रभागातील नागरिकांना बरोबर घेऊन मोठ्या उत्साहात सांस्कृतिक धार्मिक ऐतिहासिक कार्यक्रम साजरे केली जात आहे असे त्या म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here