दिपक (आण्णा) लंके यांच्या अभ्यासू मध्यस्थी मधुन पिंपळनेर ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण मागे ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 30, 2023

दिपक (आण्णा) लंके यांच्या अभ्यासू मध्यस्थी मधुन पिंपळनेर ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण मागे !

दिपक (आण्णा) लंके यांच्या अभ्यासू मध्यस्थी मधुन पिंपळनेर ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण मागे!

आगार प्रमुख श्री.पराग भोपळे यांनी पिंपळनेर ग्रामस्थांच्या मागण्या वर घेतला सकारात्मक निर्णय!
नगरी दवंडी 
पारनेर - पारनेर एस.टी. आगाराच्या अनियमित फेऱ्या विरोधात विद्यार्थी व ग्रामस्थांची होणारी हेळसांड लक्षात घेता व वारंवार पारनेर आगाराशी पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे सोमवारी पिंपळनेर ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले. आगर प्रमुख श्री पराग भोपळे साहेब यांना बस सेवापूर्ववत सुरू करणे संदर्भात वेळोवेळी निवेदन व प्रत्यक्ष भेटून अर्ज दिले आसतानाही अनियमीतता आढळून आली.
बस सेवा बंद झाल्याने सामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे . या भागातील जेष्ठ नागरिकांना, विद्यार्थी, महिला प्रवासी, शेतकरी यांना नाहक त्रास होत आहे. शासकीय कामांसाठी औषध उपचारासाठी पारनेर शिरूर येथे जाणे गरजेचे असते बस सेवा नसल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागतो.
पिंपळनेर मार्गे सुरु असणाऱ्या बस सेवा पूर्ववत सुरू करणे बाबत मा. आमदार श्री निलेश साहेब यांनी आगार प्रमुखांना लेखी पत्र दिले होते परंतु त्याची त्यांनी दखल घेतली नाही पिंपळनेर येथे महाराष्ट्रातील पाचवे संत श्री.संत निळोबाराय यांचे संजीवन समाधी असून या ठिकाणी भाविकांची नेहमी गर्दी असते. सदर देवस्थानला " ब " वर्ग दर्जा मिळाला आहे. महाराष्ट्रातून विविध भागातून पर्यटक देखील भेट देण्यासाठी येत असल्याने अशा स्थितीत बस सेवा बंद असल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत आहे . अशा अनेक अडचणी भाविक भक्ता बरोबरच पंचक्रोशीतील जेष्ठ नागरिकांची कुचंबना होत आहे.
त्या सर्व गोष्टीच्या मुळे एस टी आगाराच्या निषेधार्थ आज उपोषण श्री.देवेंद्र लटांबळे सरपंच श्री .सुभाष गाजरे , मा . सरपंच मा.श्री दत्तात्रय रखमाजी लटांबळे मा.ग्रा.सदस्य श्री सीताराम कळसकर मा.ग्रा.सदस्य यांच्या नेतृत्वाखाली उपोषणास सुरुवात झाली होती.
सुमारे 300 नागरिकांनी जाहीर पाठिंबा दिला असून या उपोषणास मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. गावातील विविध सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा सुद्धा मिळळा. उपोषणाची दखल न घेतल्यास पारनेर आगाराच्या गाड्या राळेगणसिद्धी चौकात अडवण्याचा इशारा नागरिकांनी दिला होता.
पारनेर आगार प्रमुखांच्या आडमुठे धोरणाचा जाहीर निषेध करत या वेळी श्री. निलेशशेठ लटांबळे मा.नगराध्यक्ष शिरूर उपसरपंच सौ.साधनाताई हजारे सौ. राजश्री खामकर यांनी उपोषणास जाहीर पाठिंबा जाहीर दिला. 
परस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आमदार निलेशजी लंके यांचे जेष्ठ बंधु दिपक आण्णा लंके यांनी ग्रामस्थांच्या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करत अभ्यासू मध्यस्ती करत आगार प्रमुख भोपळे व ग्रामस्थांमध्ये समन्वय साधत आभ्यासु तोडगा काढत बुधवार पासुन सर्व बस फेर्‍या ठरल्या प्रमाणे नियमीत सुरु होतील व बसचा चालक प्रत्येक फेरीत पिंपळनेर बस थांब्यावर बसची नोंद रजिष्टर करेल आसे आगार प्रमुख भोपळे यांनी दिपक लंके व पिंपळनेर ग्रामस्थांना आश्वासित करत उपोषण कर्त्यांना उपोषण लिबु सरबत देत मागे घ्यावयास लावले.
यावेळी उपोषन करते मान्यवरांसमवेत
सरपंच देवेंद्र लटांबळे , सुभाष गाजरे , दत्तात्रय लटांबळे , सिताराम कळसकर , साधनाताई हजारे , मधुकर तुळशीराम कळसकर सर भालेकर , गोपाळ काका मकाशीर , बापू कांबळे , राजश्री खामकर,कल्पना गाजरे , गोकुळ रासकर , रूपाली कळसकर , सीमा भालेकर , काजल देंडगे , विवेक काळोखे , भाऊ सोनवणे,अक्षय पोटे किरण खुपटे, एस बी रासकर सर संपतराव सावंत पोपट रासकर , भाऊसाहेब खामकर बबन साबळे बाळासाहेब गाडे पांडुरंग रासकर दीपक कळसकर राजेंद्र सोंडकर यासह पिंपळनेर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment