पारंपारिक मनोरंजने ही काळाची गरज ः आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, January 31, 2023

पारंपारिक मनोरंजने ही काळाची गरज ः आ. जगताप

 पारंपारिक मनोरंजने ही काळाची गरज ः आ. जगताप

सावेडी नाका येथे बॉम्बे सर्कसचे उद्घाटन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये पारंपारिक मनोरंजने व मैदानी खेळ दिवसेंदिवस लोपपावत चालली आहे. आपल्या परंपरेमध्ये या गोष्टींना खूप महत्त्व आहे. सध्या मोबाईलच्या युगामध्ये आपण पारंपारिक मनोरंजने व मैदानी खेळाकडे दुर्लक्ष केले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये कोविडच्या संकट काळामुळे सर्कसच्या पारंपारिक खेळावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे सर्कस खेळातील कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आपली पारंपारिक मनोरंजने अबाधित राहण्यासाठी सर्व नागरिकांनी या मनोरंजनाचा लाभ घेतला पाहिजे. सावेडी नाका येथे आलेल्या बॉम्बे सर्कस पाहण्यासाठी नगरकरांनी जावे जेणेकरून पारंपारिक मनोरंजने ही टिकली जातील पाहिजेत ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
सावेडी नाका येथे आलेल्या बॉम्बे सर्कसचे उद्घाटन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, आकाश दंडवते, जयंत भिंगारदिवे, सागर दंडवते, किरण दंडवते, संतोष शिंदे, गणेश बारस्कर, मनोज आडोळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here