संस्कृती रक्षणाबरोबरच पर्यावरण रक्षणाची जबाबदारी घ्यावी ः सौ. कदम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 31, 2023

संस्कृती रक्षणाबरोबरच पर्यावरण रक्षणाची जबाबदारी घ्यावी ः सौ. कदम

 संस्कृती रक्षणाबरोबरच पर्यावरण रक्षणाची जबाबदारी घ्यावी ः सौ. कदम

माजी महापौर सुरेखा कदम यांच्यावतीने हळदी-कुंकू कार्यक्रमात कापडी पिशव्यांचे वितरण.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सण-समारंभातून आपल्या संस्कृतीच्या रक्षणाबरोबरच पर्यावरण रक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे. आपले सण-उत्सव हे पर्यावरणपुरक असेच आहेत. या सणानिमित्त एकत्र आलेल्या महिलांनी आपल्या उन्नत्तीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. महिलांच्या विकासासाठी महिलांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. एकमेकींचे सुख-दु:ख वाटून घेऊन मदतीचा हात दिला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे सामाजिक दायित्व जपण्याचे कामही झाले पाहिजे. पर्यावरणाबाबत आपण फक्त सोशल मिडियावरच कॉपी-पेस्ट करतो, परंतु प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतला पाहिजे. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, प्लॅस्टिक बंदी अशा उपक्रमातूनही आपण पर्यावरणाचे रक्षण करु शकतो, असे प्रतिपादन माजी महापौर सौ.सुरेखा कदम यांनी केले.
माजी महापौर सुरेखा कदम यांच्यावतीने हळदी-कुंकू कार्यक्रमानिमित्त महिलांना वाण म्हणून पर्यावरणपुरक कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी सोनाली कदम, सिमा कदम, भारती कदम, जयश्री कदम आदिंसह महिला.
पुढे बोलतांना सुरेखा कदम म्हणाल्या, प्रभागातील नागरिकांना सर्वोतोपरि सुविधा पुरविण्यासाठी आपण प्रयत्नशिल असून, विविध विकास कामांच्या माध्यमातून प्रभागाचा विकास साधला जात आहे. त्याचप्रमाणे विविध सण-उत्सव नागरिक-महिलांसह साजरे करुन त्यांच्यात चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आजच्या हळदी-कुंकू कार्यक्रमात कापडी पिशव्या वाटप करुन पर्यावरण रक्षणाबाबत जागृती करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.
या हळदी-कुंकू कार्यक्रमास महापौर रोहिणी शेंडगे, माजी उपमहापौर गितांजली काळे, महिला बाल कल्याण सभापती पुष्पा बोरुडे, नगरसेविका सुवर्णा गेनप्पा, सुवर्णा जाधव, चैताली बोराटे, सौ.कावरे, सौ.शिंदे, सौ.कवडे, आदिंनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
वाण म्हणून कापडी पिशव्यांचे वाटप करण्याच्या उपक्रमांची अनेकांनी कौतुक केले. कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्वांचे स्वागत सोनाली कदम यांनी केले तर आभार सिमा कदम यांनी मानले.

No comments:

Post a Comment