’न्यू लॉ कॉलेज’मध्ये यीनच्या अध्यक्षपदी दुसुंगे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 31, 2023

’न्यू लॉ कॉलेज’मध्ये यीनच्या अध्यक्षपदी दुसुंगे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार.

 ’न्यू लॉ कॉलेज’मध्ये यीनच्या अध्यक्षपदी दुसुंगे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित होऊन त्यांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (’यिन’) माध्यमातून निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. शहरातील न्यू लॉ कॉलेजमध्ये चुरशीने लढविल्या गेलेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदी माधव दुसुंगे याने बाजी मारली, तर ओंकार काटे यांनी उपाध्यक्षपदी. निवडणुकीत अनुजा गाडे, दिनेश शिंदे, अथर्व अष्टेकर, अजय सरोदे, मोहित डापसे हे सात उमेदवार रिंगणात होते. कॉलेजमध्ये प्रथमच बॅलेटपेपरवर घेतलेल्या या निवडणुकीत विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल होते. पसंतीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. यावेळी 405 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर, विद्यार्थी मतदारांच्या भेटीगाठी यामुळे निवडणुकीला रंग चढला होता. निकाल लागताच विजयी उमेदवारांकडून कॉलेज परिसरात गुलाल उधळून फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली.
या निवडीबद्दल नगरसेवक शाम नळकांडे मित्र मंडळाच्या वतीने दुसुंगे यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी समवेत उत्कर्ष लुटे, अमर निमसे, सुदर्शन चौधरी, प्रसाद बेंद्रे,प्रसाद शिंदे, रोहित मोरे,कुणाल खताळ, ऋषिकेश थोरात, प्रांजळ खाकाळ, प्रज्वल नळकांडे अनिकेत जाधव आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment