नगर मधील घटना.. विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 13, 2023

नगर मधील घटना.. विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार.

 विवाहाचे आमीष दाखवून बीड जिल्ह्यातील तरुणीवर अत्याचार.


अहमदनगर :
लग्नाच्या आमिषाने बीड जिल्ह्यातील शिरूर कासार मधील पण नगरमध्ये राहणार्‍या तरूणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून पीडितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात सुरेश काशीनाथ प्रधान (रा. रा रांजणगाव पोळा, ता. जि. औरंगाबाद, हल्ली रा. दूध डेअरी चौक, बायपास रोड, नगर) याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी तरुणी सध्या नगरमध्ये राहते. तिच्यावर सुरेश प्रधान याने 14 फेब्रुवारी 2017 ते सन 2022 पर्यंत नगरमधील सावेडी, बोल्हेगाव व तो रहात असलेल्या ठिकाणी दूध डेअरीचौक येथे वेळोवेळी अत्याचार केला. तुला बायकोसारखी वागवतो, लग्न करतो, असे लग्नाचे म्हणून आमिष दाखवून त्याने वेळोवेळी अत्याचार केल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे.
10 जानेवारी 2023 रोजी सकाळी साडेदहा वा. पीडिता सुरेशच्या प्रेमदान हडको, सावेडी येथील कार्यालयात गेली असता, नेवासा येथील एका महिलेशी सुरेशचे संबंध असल्याचे पाहिले. त्यावेळी पीडितेला सुरेश व त्या महिलेने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. कोणाला सांगितले, तर जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याचेही पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.


No comments:

Post a Comment