मराठी चित्रपट गीते, राष्ट्रभक्तीपर गीते, आई नाटिका प्रेक्षकांची मने जिंकली. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, January 31, 2023

मराठी चित्रपट गीते, राष्ट्रभक्तीपर गीते, आई नाटिका प्रेक्षकांची मने जिंकली.

 मराठी चित्रपट गीते, राष्ट्रभक्तीपर गीते, आई नाटिका प्रेक्षकांची मने जिंकली.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
आष्टी ः  आष्टी येथील पंडीत जवाहरलाल नेहरू प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे दरवर्षीप्रमाणेच अतिशय सुरेख नियोजनात वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.  या स्नेह संमेलनाचे उदघाटन शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. दमयंतीताई धोंडे, युवानेते अभयराजे धोंडे,
गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव, शेतकरी शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक विठ्ठलआण्णा बन्सोडे, माजी जि. प. सदस्य बापूराव धोंडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री भाऊसाहेब लटपटे, प्रशासन अधिकारी प्राचार्य डी. बी. राऊत सर,  प्रा. शिवदास विधाते, डॉ. नदीम शेख, जालिंदर पोकळे, पत्रकार आण्णासाहेब साबळे, प्राचार्य सुरेश बोडखे या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी स्नेह संमेलनात शाळेतील विद्यार्थ्यांनी भक्तीगीत, समुह नृत्य, स्फुर्तीगीत, लोकगीत,  देशभक्तीपर गीत, पारंपरिक सांस्कृतिक गीत, शिवचरित्र शिवगीते, वारकरी गीत, मराठी  चित्रपटातील गीते, विद्यार्थ्यांनी विविध नृत्य प्रकार सादर केले. त्याचबरोबर आई नाटिका, एकांकिका तसेच बहारदार सूत्रसंचालन करणार्‍या विध्यार्थ्यांनी मराठमोळे उखाणे घेऊन प्रेक्षकांना खदखदून हसवत रसिकांची मने जिंकत शाळेच्या विद्यार्थी व विध्यार्थीनी मोठ्या संख्येने भाग घेऊन सुरेख नृत्य कलेचे दर्शन घडवले. यावेळी पत्रकार प्रविण पोकळे, पत्रकार संतोष सानप, पत्रकार अविशांत कुमकर, आदर्श शिक्षक राजेंद्र लाड, पिंपरी गावचे माजी सरपंच महादेव कोंडे, प्राध्यापक,
मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेह संमेलन यशस्वी होण्यासाठी सर्वा शिक्षक, शिक्षिकांनी परिश्रम घेतले. या सांस्कृतिक कार्यक्रमात आईया विषयावर सर्व गीते व नाटिका सादर झाली आहे या नाटिकेचे प्रेक्षकांनी खूप अभिनंदन केले. या स्नेह संमेलनाच्या समारोपास संस्थेचे अध्यक्ष माजी आ. भीमराव धोंडे,  भाजपा नेते वाल्मीक तात्या निकाळजे, दैनिक झुंजार नेताचे उपसंपादक उत्तम बोडखे हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी धोंडे साहेब म्हणाले की,
विद्यार्थ्यांंच्या अंगी असलेले सुप्त कला गुणांना वाव मिळविण्यासाठी असे स्नेहसंमेलन आवश्यक असते.  आपल्या कला गुणांचे दर्शन घडविल्याने कला वृद्धिंगत होते,  तसेच विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासाकडेही अधिक लक्ष द्यावे असे आवाहन केले. दहावी,  बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या, पंडीत नेहरु माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षकांनी स्नेहसंमेलनाचे चांगले नियोजन केल्याबद्दल कौतुही केले. यावेळी माजी आ. भीमराव धोंडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विविध गुणदर्शनाचे प्रदर्शन करणार्‍या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी आष्टी शहरातील व परिसरातील गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आष्टी शहरातील ग्रामस्थांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे. मेहेर मँडम व मोटे सरांनी बसवलेले वासू देवहे गीत आणि इंग्रजीचे शिक्षक गायकवाड सर यांनी बसवलेली आईही नाटिका हे कार्यक्रमांचे खास आकर्षण ठरले या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री ससाणे सर, श्री काळे, श्री वाल्हेकर सर यांनी केले. शेवटी उपस्थित मान्यवर व प्रेक्षकांचे आभार विद्यालयाचे प्राचार्य सुरेश बोडखे सर यांनी मानले. व कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here