तोफखाना हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा.पाच जण अटकेत.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 31, 2023

तोफखाना हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा.पाच जण अटकेत..

तोफखाना हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा.पाच जण अटकेत..


नगर -
तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत जंगुभाई तालमीजवळील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. जुगार खेळताना पाच जणांना पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व दुचाकी असा 42 हजार 280 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार योगेश सातपुते यांनी फिर्याद दिली आहे.
अनिल भाऊसाहेब खैरे (वय 29 रा. पंचवटी, पाईपलाइन रोड, सावेडी), अंबादास दत्तात्रय येंगुल (वय 52 रा. शमी गणपती मागे, नालेगाव), सतिष सुनील ससाणे (वय 33 रा. सर्जेपुरा), प्रशांत वसंत देठे (वय 37 रा. सुर्यानगर, पाईपलाइन रोड, सावेडी), निलेश वसंत येंगुल (वय 26 रा. दातरंगे मळा, नालेगाव) अशी पकडलेल्याची नावे आहेत.

No comments:

Post a Comment