या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संपूर्ण बॉडी तील पदासाठी बोली लावल्याचा व्हिडिओ व्हायरल.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, January 29, 2023

या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संपूर्ण बॉडी तील पदासाठी बोली लावल्याचा व्हिडिओ व्हायरल..

 या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संपूर्ण बॉडी तील पदासाठी बोली लावल्याचा व्हिडिओ व्हायरल..


औरंगाबाद -
औरंगाबाद जिल्ह्यातील सेलूद गावामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लावण्यात आला आहे. यात चक्क सरपंच पद हे 14.5 लाखात विकले गेले, तर उपसरपंच पद हे 4 लाखात विकले गेले. काही दिवसांपूर्वी राज्यभरात 7 हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील 216 ग्रामपंचायतीच्या निवडणूक देखील पार पडल्या. यात सेलूद गावातील निवडणूक बिनविरोध झाल्याचे दाखविण्याचे आली असली तरी या निवडणुकीत संपूर्ण बॉडीतील पदासाठी बोली लागल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. मात्र आता याच सेलुद ग्रामपंचायतीच्या लिलावाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. सरपंचपद 14 लाख 50 हजार, तर उपसरपंच पद 4 लाखात विकले, त्याचबरोबर सदस्य पदासाठी 70 हजारांपासून 2 लाखापर्यंत बोली लागली होती.
औरंगाबाद तालुक्यातील सेलूद गावातील मंदिरासमोर ग्रामसभा बोलवून ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींच्या पदांचा लिलाव केला होता. सरकार दरबारी मात्र ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्याचा केला बनाव रचण्यात आल्याचे उजेडात आले आहे. सरपंचपदी निवडून आलेल्या सरपंच पतीने मात्र लिलावाचा झाला नसल्याचे सांगितले असले तरी उपसरपंचाने लिलाव न पटल्याने पदाचा राजीनामा देत ही गोष्ट उजेडात आणल्याची माहिती समोर सेत आहे.

No comments:

Post a Comment