देशभक्ती समूहगीत स्पर्धेत न्याती इंटरनॅशनल स्कूल प्रथम. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, January 29, 2023

देशभक्ती समूहगीत स्पर्धेत न्याती इंटरनॅशनल स्कूल प्रथम.

 देशभक्ती समूहगीत स्पर्धेत न्याती इंटरनॅशनल स्कूल प्रथम.


नगरी दवंडी 
अहमदनगर : प्रजासत्ताक दिनानिमित्त  अहमदनगर सिंधी एज्युकेशन सोसायटीची सेंट विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल अहमदनगर आयोजित देश रंगीला आंतरशालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा घेण्यात आली .या स्पर्धेत बेलापूरच्या  न्याती समता इंटरनॅशनल स्कूल   शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. ही  स्पर्धा अहमदनगर मधील माऊली सभागृह येथे पार पडली. गट क्रमांक 1 मध्ये स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील आर्मी पब्लिक स्कूल, अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूल, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, चित्रकूट इंटरनॅशनल स्कूल, कर्नल परब स्कूल, गॅलेक्सी नॅशनल स्कूल, किशोर संस्कृत संवर्धिनी, मेहेर इंग्लिश स्कूल, माऊंट लिट्रा झी स्कूल, रेणाविकार शाळा, सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल, सखाराम मेहेत्रे शाळा, समर्थ विद्या मंदिर, रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन, सेंट मायकल इंग्लिश स्कूल, तक्षिला स्कूल, उद्धव अकॅडमी, नवीन मराठी शाळा विश्रामबाग आदी शाळांचा समावेश होता. तर गट क्रमांक 2 मध्ये 13 शाळा सहभागी होत्या.
 या यशाबद्दल पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते   सन्मानचिन्ह, ट्रॉफी व धनादेश देण्यात आला.  या समूह गीतात  जयेश वाघ, स्वानंदी पाटील, श्रीजा काळे, समृद्धी बडाख, रुद्रा घोरपडे, आराध्या शिंदे, श्रुती पवार, अनिशा जगधने, वृंदा न्याती, श्रद्धा थोरात, रुद्रानी गोसावी, मुस्तफा रझा, श्रीराज देशमुख हे विद्यार्थी सहभागी होते. त्यांना प्रशाळेतील संगीत शिक्षक उद्धव म्हस्के यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त स्वाती कोयटे, संदीप  कोयटे, विद्यालयाचे संस्थापक  अनिल न्याती, सचिव राकेश न्याती, मुकेश न्याती, शाळा समिती सदस्या कोमल न्याती, वैशाली न्याती, शैक्षणिक संचालक धनेश गांधी, उपप्राचार्या सोनल चोभे यांनी अभिनंदन केले.

ग्रामीण भागातही गुणवत्ता भरपूर.
पालक नेहमीच ग्रामीण आणि शहरी शाळा अशी तुलना करताना दिसतात.आपला देश हा खेड्यापाड्यांचा बनलेला आहे.आपल्या मुलाला बेस्ट देण्याचा प्रत्येक पालकांचा प्रयत्न असतो.पण खेड्यातही गुणवत्ता कमी काही.बेलापूर हा तसा ग्रामीण भाग आहे पण तेथील विद्यार्थीही योग्य मार्गदर्शन आणि सराव ,जिद्द या जोरावर शहरी शाळांबरोबर स्पर्धा करू शकतात असे म्हणत पदमश्री पोपटराव पवार यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक आणि अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment