प्रजासत्ताकदिनी देहरेत गुणवंत विद्यार्थी,शिक्षकांचा गौरव. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, January 29, 2023

प्रजासत्ताकदिनी देहरेत गुणवंत विद्यार्थी,शिक्षकांचा गौरव.

 प्रजासत्ताकदिनी देहरेत गुणवंत विद्यार्थी,शिक्षकांचा गौरव.

नवभारत विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात.


नगरी दवंडी
अहमदनगर : देहरे ( ता. नगर ) येथील नवभारत माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात जिल्हा मराठा संस्थेचे सदस्य दीपकराव दरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रजासत्ताकदिन मोठया उत्साहात संपन्न झाला. 
याप्रसंगी स्काऊट गाईड, आरएसपीच्या विद्यार्थ्यांनी पर्यवेक्षक शिरीष टेकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शानदार संचलन केले. विद्यार्थिनींनीचे लेझीम पथक, तसेच विदयार्थ्यांनी सादर केलेले मनोऱ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य लियाकत देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.
यावेळी विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये उत्कर्षा योगेश काळे हिचा भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्या  बद्दल सत्कार करण्यात आला.  अभिजित लांडगे, शुभम करंडे यांचाही अनुक्रमे विद्यालयात द्वितीय व तृतीय आल्याबद्दल व शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या तेजस गाडेकर, कवी  कृष्णांजली, सार्थक बोर्डे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपक्रमशील भूगोल शिक्षक म्हणून एल. ए. झंजाड तर भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेचा उपक्रम यशस्वीरित्या व पारदर्शीपणे राबविल्याबद्दल प्राचार्य लियाकत देशमुख यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सहभागी शिक्षक पी. पी. मुळे, ए. व्ही. म्हस्के, आर. एस. पवार, ए. एस. निमसे यांचाही संस्थेचे सदस्य दीपकराव दरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. डी. कांडेकर यांनी केले. 
यावेळी देहरे गावातील विविध क्षेत्रातील आजीमाजी पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment