२५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी विनाअपघात सेवा केलेल्या चालकांचा एसटीतर्फे विशेष गौरव. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, January 29, 2023

२५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी विनाअपघात सेवा केलेल्या चालकांचा एसटीतर्फे विशेष गौरव.

 २५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी विनाअपघात सेवा केलेल्या चालकांचा एसटीतर्फे विशेष गौरव.


नगरी दवंडी
अहमदनगर : एसटीत २५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी विनाअपघात सेवा केलेल्या चालकांचा एसटीतर्फे नुकताच विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात अहमदनगर विभागातील 23 चालकांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. यामध्ये चालकांना २५ वर्षे विना अपघात सेवा केल्याबद्दल  २५ हजार रुपये धनादेश, सन्मानपत्र, २५ वर्ष विना अपघात सेवेचा बिल्ला, स्मृतिचिन्ह, आणि पुष्पगुच्छ देऊन तसेच चालकांच्या पत्नीस साडी व खन आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर विभागाच्या विभाग नियंत्रक  मनीषा सपकाळ  होत्या. याप्रसंगी मुकुंद नगराळे(यंत्र अभियंता चालन),  महादेव शिरसाठ(उपयंत्र अभियंता चालन),  बाळासाहेब एकशिंगे (कामगार अधिकारी),  अविनाश कल्हापुरे(विभागीय वाहतूक अधीक्षक),  संकेत राजहंस (विभागीय भांडार अधिकारी) वृंदा कंगले(विभागीय लेखाधिकारी),  दरेकर (विभागीय स्थापत्य अभियंता), मनीषा देवरे (आगार व्यवस्थापक, तारकपुर)  इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रदीप औटे यांनी केले तर आभार प्रदर्शन वाहतूक निरीक्षक अनिरुद्ध चव्हाण वाहतूक निरीक्षक यांनी केले.
या चालकांचा झाला सन्मान - भास्कर विठोबा निमसे - तारकपूर, महेमुद बाबुलाल शेख - तारकपूर, सतिष नारायण चव्हाण - तारकपूर, रमेश बबन साठे - तारकपूर. शिवाजी मल्हारी शिंदे - तारकपूर, रामदास रावसाहेब जासुद - तारकपूर, भगवान किसन लटपटे - तारकपूर, गोपीनाथ बजाबा वाकळे - संगमनेर, अशोक बळीराम शिरसाठ - संगमनेर,  राजेंद्र बाबुराव सरोदे - शेवगांव, सुभाष सोना सौदागर - शेवगांव,  महादेव यशवंत तुपविहिरे - शेवगांव,  नारायण बाबुराव जाधव - शेवगांव, छगन कारभारी संवत्सरकर - कोपरगांव, सुभाष धोंडीराम मुरकुटे - कोपरगांव, जगन्नाथ गोविंद शेळके - कोपरगांव, सुसेन नामदेव कोल्हे - जामखेड. दिनकर गणपत उघडे - जामखेड. दत्तात्रय बुवासाहेब फुले - श्रीगोंदा. महेमुद छन्नु पटेल - नेवासा, रोहिदास यशवंत घुले - पाथर्डी, शब्बीर खान गुलमहंमद पठाण - अकोले,  पांडुरंग विठ्ठल फुंदे - शेवगांव

No comments:

Post a Comment