शेजारच्या जोडप्याचं भांडण सोडवायला गेली अन् घडले असे की जीव गमवावा लागला,.. आता पतीची न्यायाची मागणी... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 11, 2023

शेजारच्या जोडप्याचं भांडण सोडवायला गेली अन् घडले असे की जीव गमवावा लागला,.. आता पतीची न्यायाची मागणी...

शेजारच्या जोडप्याचं भांडण सोडवायला गेली अन्  घडले असे की जीव गमवावा लागला,.. आता पतीची न्यायाची मागणी...
सोलापूर: शेजारच्या नवरा-बायकोचं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पत्नीचा डोक्याला मार लागून मृत्यू झाला, तिच्या नवऱ्याने आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. शेजारी राहणाऱ्या नवरा बायकोचे कडाक्याचे भांडण झाले होते. त्यांचं हे भांडण पाहून माझी पत्नी त्यांना वाचवण्यासाठी गेली होती. तेव्हा माझ्या पत्नीच्या डोक्याला जबर मार लागला. यातच तिचा मृत्यू झाला, असं या पतीने सांहितलं आहे.
संगिता आतिश साळुंखे (वय ३८ रा गोदूताई विडी घरकुल,सोलापूर) असं मृत पत्नीचं नाव आहे. शेजाऱ्याच्या भांडणात माझ्या पत्नीचा हकनाक बळी गेला. मला न्याय द्या, अशी आर्त हाक मृत महिलेच्या पतीने दिली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. लवकरच याबाबत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शेजारी राहत असलेले गणेश नरसप्पा कैरमकोंडा आणि त्यांच्या पत्नीचे कडाक्याचे भांडण सुरू होते. संगिता साळुंखे या त्यांचं भांडण सोडवण्यासाठी गेले असता भांडणात संगिता साळुंखे यांना धक्का लागून त्या खाली पडल्या. यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्या जागेवर बेशुद्ध झाल्या, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment