नाशिक पदवीधर मतदार संघातून या तिघांचे अर्ज दाखल.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, January 10, 2023

नाशिक पदवीधर मतदार संघातून या तिघांचे अर्ज दाखल..

नाशिक पदवीधर मतदार संघातून या तिघांचे अर्ज दाखल..
अहमदनगर - महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मंगळवार दि.10 जानेवारी,2023 रोजी तीन नामनिर्देशन अर्ज झालेले आहेत,अशी माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त रमेश काळे यांनी दिली आहे.आज नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यामध्ये शुभांगी भास्कर पाटील, धुळे,ॲड. जुबेर नसीर शेख धुळे व सोमनाथ नाना गायकवाड, नाशिक या तिन्ही उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत.निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनाची मुदत 12 जानेवारी 2023 पर्यंत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here