काँग्रेसचे ज्येष्ठ नेते , इंटकच्या अध्यक्षांचे निधन.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 11, 2023

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते , इंटकच्या अध्यक्षांचे निधन..

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते , इंटकच्या अध्यक्षांचे निधन..
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि इंटकचे प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश जितमल छाजेड यांचं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. मंगळवारी ते नागपूर येथील पक्षाच्या बैठकीसाठी निघाले होते. पण, त्याआधी त्यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं.
जयप्रकाश जितमल छाजेड यांची गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती त्यानंतरही नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी जाण्यासाठी निघाले होते. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना प्रकृतीची काळजी घेण्यास सांगितलं आणि काही वेळानंतर त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यांना तातडीने नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment