राजकारणा मुळे मित्रानेच मित्राला संपवले... नगरसेवक निघाला आरोपी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 10, 2023

राजकारणा मुळे मित्रानेच मित्राला संपवले... नगरसेवक निघाला आरोपी.

 राजकारणा मुळे मित्रानेच मित्राला संपवले... नगरसेवक निघाला आरोपी.


बीड :
बीडमध्ये राजकारणापायी एकाचा जीव गेल्याची घटना घडली आहे. आमच्या विरोधात निवडणुकीत काम केलं म्हणून बीडच्या आष्टी शहरातील दोन दिवसापूर्वी दोन भाऊ आणि अन्य एका व्यक्तीला घरी बोलावून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बीडच्या आष्टी शहरात घडली आहे. यामध्ये एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मारहाण करणार्‍या नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या रागातून दोन भाऊ आणि एक अन्य व्यक्तीला घरी बोलावून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मारहाण झालेल्या मधील एक जण गंभीर झाल्याने उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला आहे. तात्या बबनराव सुरवसे असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर नाना बबन सुरवसे आणि अमोल मुरकुटे हे दोघे गंभीर जखमी असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहे. याप्रकरणी आष्टी पोलीसांत नगरसेवकांसह इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे.
मुख्य आरोपी नगरसेवक संतोष सुरवसे हा फरार झाला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये तू आमचा माणूस असून विरोधात काम करत होतास, या कारणावरुन ही घटना घडली आहे. आरोपीने तिघांना प्रेमाने घरी बोलवले नंतर पाच सहा जणांनी मिळून तिघांना बेदम मारहाण केली यात एकाचा मृत्यू झाला आणि हे प्रकरण उघडकीस आलं. मात्र राजकारण खालच्या पातळीपर्यंत गेल्यामुळे जिल्ह्यात यावेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये देखील असे प्रकार घडले होते. पोलीस फरार झालेल्या नगरसेवक संतोष सुरवसेचा तपास करत असून इतर बाबींचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

No comments:

Post a Comment