हुंड्यासाठी छळामुळे विवाहितेची आत्महत्या.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 14, 2023

हुंड्यासाठी छळामुळे विवाहितेची आत्महत्या..

 हुंड्यासाठी छळामुळे विवाहितेची आत्महत्या..

पती सासू-सासरे यांना 2 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा.


अहमदनगर -
विवाहितेचा हुंड्यासाठी छळ करून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू आणि सासरा अशा तिघांना दोन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्या आली. जिल्हा न्यायाधीश सुनिल एस. गोसावी यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. पती रोहिदास गुंजाळ, सासरा भानुदास नस्सु गुंजाळ, सुशिलाबाई भानुदास गुंजाळ (सर्व रा. दहिगांवने, ता. शेवगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
या घटनेबाबत रामपूर (ता. श्रीरामपूर) येथील मयत विवाहितेच्या वडिलांनी शेवगाव पोलिस ठाण्यातफिर्याद दिली होती. विवाहानंतर  केली. दिवसांनी घरातील कामासाठी विवाहितेला सासरा आणि सासू सारखीशिवीगाळ करून त्रास देत होती. ट्रॅक्टर घेण्यासाठी विवाहितेला आरोपींनी पाच लाख माहेरहून घेवून येण्यासाठी मागणी सुरू केली. तसेच रकमेसाठी विवाहितेचा छळ करीत होते. सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने स्वतःला पेटवून घेवून आत्महत्या केली होती.
विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन अंकुश राऊत यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयात आलेला पुरावा तसेच सरकारी वकील अ‍ॅड. जी. के. मुखळे, अ‍ॅड. अनिल ढगे व अ‍ॅड. मंगेश दिवाणे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींना दोषी धरून शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी हेड कॉन्स्टेबल प्रबोध अण्णासाहेब हंचे सहकार्य केलं.

No comments:

Post a Comment