बजरंग दल हे जगातील मोठे संघटन - शंकरजी गायकर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 13, 2023

बजरंग दल हे जगातील मोठे संघटन - शंकरजी गायकर.

बजरंगदलाच्या शौर्य संचलन यात्रेचे शहरात पुष्पवृष्टीने स्वागत. 

बजरंग दल हे जगातील मोठे संघटन - शंकरजी गायकर.


नगर -
बजरंग दल हे जगातील मोठे संघटन आहे 40 वर्षाची परंपरा असलेले पन्नास हजार शाखा देशभर आहेत.ज्यावेळेस देशात मोठे संकट उभे राहिले त्यावेळेस बजरंग दलाने रक्त सांडले आहे.देशामध्ये भूदल,नौदल व वायुदल याप्रमाणे राष्ट्राच्या चौथ्या स्तंभाचे नाव बजरंग दल आहे.बजरंग दलाची गोरक्षणासाठी देशात नाव घेतले जाते याचे कारण म्हणजे बजरंग दलाचे दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते गोमातेच्या रक्षणासाठी शहीद झाले आहे.रात्रंदिवस गोमातेच्या रक्षणासाठी घरदार सोडून जीवाचे बलिदान देऊन बजरंग दलाचे कार्यकर्ते गोरक्षणाचे कार्य करीत आहेत. स्वतःचे बलिदान देऊन राष्ट्राचा झेंडा फडकविण्याचे काम येथे करीत आहेत. असं प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकर गायकर यांनी व्यक्त केले आहे.
नगर जिल्हा विश्व हिंदू परिषद तर्फे नगर शहरात बजरंग दलाची शौर्य संचलन यात्रा दादा चौधरी महाविद्यालय येथून निघाली.याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकर जी गायकर यांनी नक्षत्र लॉन येथे उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी गायकर बोलत होते.
याप्रसंगी बोलताना गायकर पुढे म्हणाले की, बजरंग दलाच्या देशामध्ये पन्नास हजार शाखा आहेत.आत्तापर्यंत पंधरा लाख गोमातेचे रक्षण तसेच चार ते पाच लाख भगिनींचे लव्ह जिहाद पासून संरक्षण करण्याचे मोठे कार्य बजरंग दलाने केले आहे.छत्रपती शिवाजी टर्मिनल चे नाव देण्यासाठी बजरंग दलाने मोठे आंदोलन उभे केले होते. आपले सर्वांचे सौभाग्य आहे की आज राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या निमित्त आपण एकत्र जमलो आहोत.राष्ट्रमाता जिजाऊ हे आपले अस्तित्व,हुंकार तसेच आपले कुळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष त्यांनी निर्माण केले आहे.भारतमाते प्रमाणे आपल्या मुलांचे पालन पोषण करून ज्यावेळेस आपल्या मुलांना संकट येते त्यावेळेस राष्ट्रमाता जिजाऊ या तलवार घेऊन युद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत.म्हणूनच त्यांना राष्ट्रमाता म्हणून संबोधतात. राष्ट्राचा शत्रू अफजलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणाचे कार्य करून पराक्रम गाजवला आहे.या पराक्रमाचा आदर्श सर्व युवकांनी घ्यावा.स्वामी विवेकानंदांनी या राष्ट्राचा इतिहास जगभर पोहोचला आहे. देशातील सनातन हिंदू संस्कृती चे महत्त्व जगाला पटवून दिले आहे.या स्वामी विवेकानंदांचे विचार व शिवचरित्र प्रत्येक तरुणांनी वाचले पाहिजे.महाराष्ट्राचा इतिहास हा शौर्याने व पराक्रमाने घडलेला आहे. असेही गायकर म्हणाले.
विश्व हिंदू परिषदेचे बजरंग दलाचे क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी,रा.स्व.संघाचे जिल्हा कार्यवाह वाल्मीक कुलकर्णी,सीए असो चे अध्यक्ष सीए किरण भंडारी,विश्व हिन्दु परीषदेचे उपाध्यक्ष सुभाष बायड,शहराध्यक्ष विजयकुमार पादीर,डॉ.प्रदीप उगले,प्रांत धर्म प्रसार सहप्रमुख डॉ मिलिंद मोभारकर,अँड .मंगेश नढे,संदेश भेगडे,पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रिंट मीडिया प्रमुख अमोल भांबरकर,मुकुंद चव्हाण,निलेश चिपाडे,आदी उपस्थित होते.या संचालनात बजरंग दलाचे 300 युवक सहभागी झाले होते.या संचालनात अग्रभागी गदाधारी युवक व प्रत्येकाच्या हातात भगवे ध्वज होते.हे संचालन नगर शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आले.या बजरंग दलाचे स्वागत पटवर्धन चौक येथे भारतीय जनता पार्टी,पंडित दीनदयाळ परिवार,शिवसेनेचे वतीने.फटाके वाजवून व  पुष्पवृष्टी करून करण्यात आले.बजरंग दलाचे संचलन दादा चौधरी विद्यालय,चौपाटी कारंजा,स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा,चितळे रोड,नेता सुभाष चौक,संताजी जगनाडे महाराज चौक,कापड बाजार,भिंगारवाला चौक,माणिक चौक,आशा टॉकीज चौक,पाचपीर चावडी, माळीवाडा,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून भोसले आखाडा,बुरुडगाव रोड येथून नक्षत्र लॉन येथे समारोप करण्यात आला. 

समारोप याप्रसंगी माजी महापौर भंगगवान फुलसौंदर,पंडित दीनदयाल पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा,माजी महापौर अभिषेक कळमकर,नगरसेवक भैय्या परदेशी,संतोष गेनाप्पा,ओंकार सातपुते,पै.नाना डोंगरे,नितीन शेलार,बाळासाहेब भुजबळ,ईश्वर बोरा,भैया गंधे ,निलेश लोढा,संदीप सोनार,आकाश घोलप,दत्ता घोलप,निलय गन्धे,प्रकाश गटणे,संजय आडोळे,बापू ठाणगे, प्रतीक्षाकोरेगावकर,सुनीत मिश्रा आदी उपस्थित होते. जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे यांनी प्रास्तविक केले.गौतम कराळे यांनी सूत्र संचालन केले.परिचय जिल्हा सहमंत्री मुकुल गंधे यांनी करून दिला.स्वागत बजरंग दलाचे जिल्हा संयोजक भारत थोरात यांनी केले.शहर संयोजक कुणाल भंडारी यांनी आभार मानले.उत्कर्ष गीते यांनी पद्य सादर केले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहर सहमंत्री संजय बंडी,प्रचार प्रसिद्धी प्रमुख रोहिणी पवार,श्रीकांत साठे सचिन शेळके,सोमनाथ जाधव,ज्ञानेश्वर मगर,सचिन लोखण्डे,बाली जोशी,विस्वास बेरड,अजित देशमुख,बाबासाहेब साठे,देवा पवार,अनिल राऊत,राजू चुंबळकर,दिनेश परदेशी परिश्रम घेतले. 

देशातील सर्व कानाकोपर्‍या त कश्मीरबॉर्डरवर,आसाम,नागालँड, मध्य प्रदेश ,उत्तर प्रदेश, गुजरात या सर्व ठिकाणी बजरंग दलाचे शौर्याचे संचलन शिस्तबद्ध व शांतिप्रिय मार्गाने होत आहे. प्रशासनाने विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना 149 ची नोटीस दिली आहे.त्यांनी ही नोटीस ज्यांना द्यायची आहे त्यांना द्यावी व ज्या आरोपींचा शोध घ्यावयाचा आहे त्यांचा शोध घ्यावा.कायद्याची भाषा शिकवू नये.आम्ही कायदा जाणतो. - शंकर गायकर, केंद्रीय सहमंत्री विश्व हिंदू परिषद.

No comments:

Post a Comment